कोकण रेल्वे मार्गावरील चार गाड्या पूर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 08:02 PM2021-06-25T20:02:23+5:302021-06-25T20:03:07+5:30
Konkan Railway Kankavli Sindhudurg : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही काळ थांबविण्यात आलेल्या कोकण रेल्वे मार्गावरील चार रेल्वे गाड्या पूर्ववत करण्यात आल्या आहेत. या गाड्या पश्चिम रेल्वेच्या समन्वयाने धावत आहेत. यातील तीन गाड्यांना सिंधुदुर्गातील एका स्थानकावर थांबा आहे.
कणकवली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही काळ थांबविण्यात आलेल्या कोकण रेल्वे मार्गावरील चार रेल्वे गाड्या पूर्ववत करण्यात आल्या आहेत. या गाड्या पश्चिम रेल्वेच्या समन्वयाने धावत आहेत. यातील तीन गाड्यांना सिंधुदुर्गातील एका स्थानकावर थांबा आहे.
त्यामधील हापा - मडगाव (०२९०८) ही गाडी ३० जूनपासून दर बुधवारी रात्री ९ .४० वाजता हापा येथून सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी १०.०५ वाजता वसई, ११.२५ वाजता पनवेल, सायंकाळी ७.४२ वाजता कुडाळ व रात्री १०.२० वाजता मडगावला पोहोचेल. मडगाव - हापा (०२९०७) गाडी २ जुलैपासून दर शुक्रवारी सकाळी १० वाजता मडगावहून सुटेल. सकाळी ११.३८ वाजता कुडाळ, सायंकाळी ७.४५ पनवेल, रात्री ९.०५ वाजता वसई व दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३५ वाजता हापा येथे पोहोचेल. भावनगर - कोचुवेली (०९२६०) ही गाडी २९ जूनपासून दर मंगळवारी सकाळी १०.०५ वाजता भावनगर येथून सुटेल. वसईला रात्री १०.३५, पनवेलला रात्री १२ वाजता तर दुसऱ्या दिवशी सकाळी ७.२० वाजता सिंधुदुर्गनगरी व तिसऱ्या दिवशी सकाळी ७.१० वाजता कोचुवेली येथे पोहोचेल.
कोचुवेली - भावनगर (०९२५९) ही गाडी १ जुलैपासून दर गुरुवारी दुपारी ३.४५ वाजता कोचुवेली येथून सुटेल. दुसऱ्या दिवशी दुपारी १२.४२ वाजता सिंधुदुर्गनगरी, रात्री ९.१५ वाजता पनवेल, ११ वाजता वसई रोड, तिसऱ्या दिवशी दुपारी १२.२५ वाजता भावनगर येथे पोहोचेल. इंदोर - कोचुवेली (०९३३२) ही गाडी २९ जूनपासून दर मंगळवारी रात्री ९.४० वाजता इंदोर येथून सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी १०.०५ वाजता वसई, ११.२५ पनवेल, सायंकाळी ७.४० वाजता कुडाळ व तिसऱ्या दिवशी सायंकाळी ६ वाजता कोचुवेली येथे पोहोचेल. कोचुवेली - इंदोर (०९३३१) ही गाडी २ जुलैपासून दर शुक्रवारी सकाळी ९.१५ वाजता कोचुवेली येथून सुटेल.
दुसऱ्या दिवशी पहाटे ४.२० वाजता कुडाळ, दुपारी १.२० वाजता पनवेल, ३ वाजता वसई व तिसऱ्या दिवशी पहाटे ४.४० वाजता इंदोर येथे पोहोचेल. पोरबंदर - कोचुवेली (०९२६२) ही गाडी १ जुलैपासून दर गुरुवारी आणि कोचुवेली - पोरबंदर (०९२६१) ही ४ जुलैपासून दर रविवारी धावणार असून, या गाडीला दक्षिण कोकणात फक्त रत्नागिरी स्थानकात थांबा आहे. या गाड्यांचा लाभ प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.