धमाका शिकवू नये, अन्यथा दुकान बंद करू; नारायण राणेंचा संजय राउतांना थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 04:45 PM2023-02-18T16:45:40+5:302023-02-18T16:47:08+5:30

तर जिल्ह्यातून जाऊ देणार नाही

Union Minister BJP leader Narayan Rane direct warning to MP Sanjay Raut | धमाका शिकवू नये, अन्यथा दुकान बंद करू; नारायण राणेंचा संजय राउतांना थेट इशारा

धमाका शिकवू नये, अन्यथा दुकान बंद करू; नारायण राणेंचा संजय राउतांना थेट इशारा

Next

कुडाळ : कोणी आम्हाला धमाका शिकवू नये, मनात आणलं तर एका दिवसात दुकान बंद करू, असा इशारा केंद्रीय मंत्री भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत शिवसेनेला दिला.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या कणकवली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कणकवली परिसरात ‘इलाका तुम्हारा, धमाका हमारा’ असे फलक झळकले आहेत. याकडे त्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी हा इशारा दिला. हिम्मत असेल तर समोर येऊन बोलावे, असेही सूचक वक्तव्य त्यांनी केले. जेलमध्ये जाऊन आला आणि धमाका कसला करणार? सत्तेत असताना अडीच वर्षात शिवसेनेने जिल्ह्यासाठी काय केले? जनतेसाठी काय दिलं ते सांगा?

तर जिल्ह्यातून जाऊ देणार नाही

जिल्ह्याला महाराष्ट्राला, देशाला माहीत आहे राणे काय आहेत ते. तुम्ही कुठे म्हणाल तिथे मी एकटाच येतो. सलग ३२ केसेस शिवसेनेसाठी अंगावर घेतल्या याची आठवण करून दिली. एक धक्का जरी भाजप कार्यकर्त्याला लागला, तर या जिल्ह्यातून जाऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
 

Web Title: Union Minister BJP leader Narayan Rane direct warning to MP Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.