तोपर्यंत भूखंड स्वीकारणार नाही  -- अरुणा प्रकल्पग्रस्तांनी घेतला निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 04:40 PM2019-11-22T16:40:47+5:302019-11-22T16:41:37+5:30

कल्पग्रस्तांनी जोपर्यंत आपल्याला धरणात बुडालेल्या घरांची नुकसान भरपाई, २३ नागरी सुविधांची उपलब्धता, घर भाडे आणि उपजीविका भत्ता मिळत नाही; तोपर्यंत किंजळीचा माळ येथील १३६ भूखंडधारक प्रकल्पग्रस्त भूखंड स्वीकारणार नाहीत, अशी भूमिका घेत

Until then the plot will not be accepted - Aruna project victims decide | तोपर्यंत भूखंड स्वीकारणार नाही  -- अरुणा प्रकल्पग्रस्तांनी घेतला निर्णय

अरुणा प्रकल्पग्रस्तांनी पुनर्वसन मंडळ अधिकारी तडवी यांना निवेदन दिले. यावेळी तानाजी कांबळे, सुरेश नागप, प्रकाश सावंत आदी प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

Next

वैभववाडी : अरुणा प्रकल्पग्रस्तांना किंजळीचा माळ येथे मागणी केलेल्या १३६ प्रकल्पग्रस्तांना निवासी भूखंड आणि २३ नागरी सुविधा दिल्या जात नाहीत तोपर्यंत पाचही गावठाणात एकही भूखंड सीवकारणार नाही, अशी भूमिका प्रकल्पग्रस्तांनी घेत मांगवली पुनर्वसन गावठणात आयोजित केलेल्या भूखंड वाटप शिबिराकडे पाठ फिरवली. दरम्यान भूखंड वाटपासाठी आलेल्या पुनर्वसन मंडळ अधिकाºयांना प्रकल्पग्रस्तांनी नव्या मागणीचे निवेदन दिले.

निवासी भूखंड न मिळालेल्या अरुणा प्रकल्पग्रस्तांना भूखंड वितरीत करण्यासाठी पुनर्वसन मंडळ अधिकारी तडवी यांच्या उपस्थितीत शिबिराचे आयोजन केले होते. परंतु प्रकल्पग्रस्तांनी जोपर्यंत आपल्याला धरणात बुडालेल्या घरांची नुकसान भरपाई, २३ नागरी सुविधांची उपलब्धता, घर भाडे आणि उपजीविका भत्ता मिळत नाही; तोपर्यंत किंजळीचा माळ येथील १३६ भूखंडधारक प्रकल्पग्रस्त भूखंड स्वीकारणार नाहीत, अशी भूमिका घेत तशा आशयाचे निवेदन पुनर्वसन मंडळ अधिकारी तडवी यांना दिले. 

यावेळी प्रकल्पग्रस्त तानाजी कांबळे, माजी सरपंच सुरेश नागप, प्रकाश सावंत, सूर्यकांत नागप, रामचंद्र नागप, वासुदेव नागप, प्रसन्न नागप आदी उपस्थित होते. प्रकल्पग्रस्तांनी घेतलेल्या भूमिकेमुळे भूखंड वितरण शिबिरासाठी गावठाणात गेलेल्या पुनर्वसन मंडळ अधिकाºयांना प्रकिया गुंडाळून माघारी परतावे लागले.

 

 

Web Title: Until then the plot will not be accepted - Aruna project victims decide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.