..तोपर्यंत सिंधुदुर्ग जिल्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाही - मनीष दळवी 

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: December 29, 2023 07:28 PM2023-12-29T19:28:37+5:302023-12-29T19:28:55+5:30

सिंधुदुर्ग : आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्याला जर आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचे असेल तर त्याला शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. आणि ...

Until then Sindhudurg district will not be economically viable says Manish Dalvi | ..तोपर्यंत सिंधुदुर्ग जिल्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाही - मनीष दळवी 

..तोपर्यंत सिंधुदुर्ग जिल्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाही - मनीष दळवी 

सिंधुदुर्ग : आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्याला जर आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचे असेल तर त्याला शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. आणि जोपर्यंत शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होत नाही तोपर्यंत आपला जिल्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाही, असे मत जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी जिल्हा बँकेतील गोपाळ सेवा दाता प्रतिनिधी यांच्या आढावा बैठकीत व्यक्त केले.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक, जिल्हा परिषद- सिंधुदुर्ग, गोकुळ दूध संघ- कोल्हापूर व भगिरथ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गोपाळ सेवा दाता प्रतिनिधी यांची आढावा बैठक सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भाईसाहेब सावंत सभागृहात जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुधाकर ठाकूर, डॉ. विद्यानंद देसाई, डॉ. तुषार वेंगुर्लेकर, डॉ. संतोष कुडतरकर, डॉ. गावकर, जिल्हा बँकेचे अधिकारी व जिल्ह्यातील गोपाळ सेवा दाता लाभार्थी उपस्थित होते.

यावेळी दळवी म्हणाले की, गोपाळ सेवा दाता म्हणून काम करीत असताना जिल्हा बँक, जिल्हा परिषद, भगीरथ प्रतिष्ठान व गोकुळ प्रतिष्ठानचे एक प्रतिनिधी या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी तुमच्याकडे बघितले पाहिजे, असे काम तुमच्याकडून केले गेले पाहिजे.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर म्हणाले, जिल्हा बँकेने जो विश्वास तुमच्यावर टाकलेला आहे तो विश्वास गोपाळ सेवादाता म्हणून काम करीत असताना गावातील पशुधनपालक शेतकऱ्यांना वाटला पाहिजे. ही फार मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे, असे सांगून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कामाचा अनुभव कथन

डॉ. प्रसाद देवधर यांनी आपले मनोगत व्यक्त करून उपस्थितांना या विषयाची माहिती दिली. त्यानंतर ३६ दिवसांच्या प्रशिक्षण कालावधीतील व प्रत्यक्ष काम करीत असताना आलेले अनुभव गोपाळ सेवा दाता देवेंद्र पाताडे, शुभम कवठणकर, प्राची गुरव, अंकुश माजगावकर, रामदास भोगले, रूपेश गावकर, प्रथमेश पाटील यांनी कथन केले. जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Web Title: Until then Sindhudurg district will not be economically viable says Manish Dalvi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.