सावंतवाडीत पोलिसांची अद्ययावत व्यायामशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 12:26 PM2018-08-23T12:26:09+5:302018-08-23T12:28:13+5:30
सावंतवाडी शहरातील जुन्या पोलीस ठाण्याच्या जागेत अद्ययावत व्यायामशाळा सुरू करण्यात आली आहे. याचे उद्घाटन स्वातंत्र्यदिनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक निमित गोयल यांच्या हस्ते पार पडले. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी शिवाजी मुळीक, पोलीस निरीक्षक सुनील धनावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब बाबर, योगेश जाधव, लक्ष्मण गवस, अरुण सावंत आदी उपस्थित होते.
सावंतवाडी : शहरातील जुन्या पोलीस ठाण्याच्या जागेत अद्ययावत व्यायामशाळा सुरू करण्यात आली आहे. याचे उद्घाटन स्वातंत्र्यदिनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक निमित गोयल यांच्या हस्ते पार पडले. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी शिवाजी मुळीक, पोलीस निरीक्षक सुनील धनावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब बाबर, योगेश जाधव, लक्ष्मण गवस, अरुण सावंत आदी उपस्थित होते.
सावंतवाडी पोलीस ठाण्याची इमारत नव्या जागेत सुसज्ज अशी उभारण्यात आल्यानंतर जुन्या पोलीस ठाण्याच्या इमारतीत पोलीस कर्मचाऱ्यांकरिता पेट्रोल पंप उभारण्याचा घाट घालण्यात आला होता. मात्र याबाबत काही कर्मचाऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत होता.
दरम्यान, या जागेत पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सुसज्ज व सर्व सोयींनी युक्त अशी व्यायामशाळा उभारण्यासाठी पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनी पुढाकार घेत प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी पाठबळ दिले. त्यानुसार जुन्या इमारतीत पोलीस कर्मचाऱ्यांसाठी व्यायामशाळा उभारण्यात आली असून, या व्यायामशाळेचा उपयोग फक्त पोलीस कर्मचारी घेऊ शकतात.
या व्यायामशाळेचे उद्घाटन निमित गोयल यांच्या हस्ते बुधवारी स्वातंत्र्यदिनी झाले. पोलीस कर्मचाऱ्यांकरिता सुरू करण्यात आलेल्या या व्यायामशाळेमुळे कर्मचाऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.