रोग नियंत्रणासाठी आयुर्वेदचा वापर करा

By admin | Published: February 18, 2015 12:45 AM2015-02-18T00:45:33+5:302015-02-18T00:45:33+5:30

माधवी शेट-तानावडे : तळकट येथे आरोग्य शिबिर

Use Ayurveda to control disease | रोग नियंत्रणासाठी आयुर्वेदचा वापर करा

रोग नियंत्रणासाठी आयुर्वेदचा वापर करा

Next

कसई दोडामार्ग : आयुर्वेदाचा पाया, आपले वातावरण, वनौषधी, जीवनशैली, बदलते ऋतुमान यांच्या पक्क्या पायावर आधारीत आहे. त्यामुळे रोगप्रतिबंधक म्हणून किंवा रोगनियंत्रणासाठी सुद्धा आयुर्वेदाचा आधार घेण्याचे आवाहन पणजी येथील माधवबाग आयुर्वेदिक उपचार केंद्राच्या प्रमुख डॉ. माधवी शेट -तानावडे यांनी तळकट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित मोफत आरोग्य शिबिरात बोलताना केले.
तळकट विभागात कार्यरत संकल्प प्रतिष्ठान बांदा येथील अचल आॅर्गेनिक काजू कंपनी व माधवबाग पणजी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन १५ रोजी करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी यांच्या हस्ते झाले. यावेळी सचिन काणेकर, संजय गवस, शिरीषकुमार नाईक, राजेश देसाई, तळकट सरपंच रमेश शिंदे, झोळंबे सरपंच अमृता मेस्त्री, उपसरपंच संजय वेटे, डॉ. गोविंद देसाई, माधवबागचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुपा नाईक, डॉ. स्वाती पांढरे, पंचकर्म चिकित्सक गौरव कुडाळकर, संगीता कांबळे, अपर्णा कुडतरकर, गणेश नांगरे, नाना देसाई, माजी सरपंच सुनेत्रा नांगरे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. तानावडे यांनी आयुर्वेदाचे महत्त्व उपस्थितांसमोर विषद केले. त्यानंतर आहारविषयक मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, आपल्या आजाराचे मूळ कारण हे आपल्या सदोष आहारातच असते. अशा शिबिरांचा लाभ घ्यावा व आरोग्य चांगले राखावे, असे आवाहन एकनाथ नाडकर्णी यांनी केले.
यावेळी उपस्थित सर्व रुग्णांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच इसीजी व रक्ततपासणीही करण्यात आली. दिवसभर चाललेल्या या शिबिराचा तळकट परिसरातील रुग्णांनी लाभ घेतला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन विनायक गाडगीळ यांनी
केले. (वार्ताहर)

Web Title: Use Ayurveda to control disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.