लाईफ लाईन एक्सप्रेस सेवेचा सिंधुवासियांनी लाभ घ्यावा

By admin | Published: April 15, 2017 12:59 PM2017-04-15T12:59:39+5:302017-04-15T13:06:42+5:30

दीपक केसरकर यांचे आवाहन

Use the Live Line Express service for the Sindhwansani | लाईफ लाईन एक्सप्रेस सेवेचा सिंधुवासियांनी लाभ घ्यावा

लाईफ लाईन एक्सप्रेस सेवेचा सिंधुवासियांनी लाभ घ्यावा

Next

सिंधुदुर्गनगरी, दि. १५ : लाईफलाईन एक्सप्रेस सिंधुदुर्गनगरी येथे रेल्वे स्थानकावर दिनांक १६ एप्रिल ते 18 एप्रिल अखेर येत आहे. या रेल्वेमध्ये विविध उपचाराची सुविधा आहे. या सुविधेचा सिंधु वासियांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.

आदित्य बिर्ला फायनान्शीयल सर्व्हिसेसच्या माध्यमातून तसेच महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने ही लाईफलाईन एक्सप्रेस (चालते फिरते हॉस्पीटल) ही सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.

या रेल्वेचा मुक्काम सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकावर १६ ते १८ एप्रिल असा असून या रेल्वेमध्ये डोळ्यांचे परिक्षण, कानाचे परिक्षण व आॅपरेशन, स्त्री रोग उपचार (स्तन व गर्भाशय) ग्रिवा कॅन्सर परिक्षण, तोंडाच्या कॅन्सरचे परिक्षण व उपचार, दाताचे परिक्षण व उपचार होणार असून इच्छूक रूग्णांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले असून हाडांच्या संदभार्तील रोगांचे व कानाच्या तक्रारीचे परिक्षण दिनांक १५ व १६ एप्रिल रोजी जिल्हा रूग्णालयात करणार असल्याचे सांगितले.

पालकमंत्री केसरकर यांनी जिल्हा रूग्णालयास भेट देऊन याबाबतच्या तयारीची माहिती घेतली. लाईफलाईन एक्सप्रेसचे प्रोजेक्ट मॅनेजर डॉ. याज्ञीक वाझा यांनी यावेळी पालकमंत्री महोदयांना सविस्तर माहिती दिली.
या उपचार सुविधेमध्ये विशेष तज्ञ डॉक्टरांच्याव्दारे रोगाची तपासणी केली जाणार असून मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. तसेच रूग्णांना मोफत औषधे व भोजन, निवासाची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. लाईफलाईन एक्सप्रेस रेल्वे स्टेशन सिंधुदुर्ग येथे सकाळी ९.00 ते सायंकाळी ४.00 वाजेपर्यंत उपरोक्त कालावधीत सुरू राहणार आहे. रूग्णांनी येताना आपल्यासोबत आधारकार्ड आणावे,असे आवाहनही करण्यात आले आहे.

Web Title: Use the Live Line Express service for the Sindhwansani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.