‘सगुणा’ पद्धतीचा वापर वाढतोय--जिल्हा कृषी अधीक्षक आरिफ शहा

By Admin | Published: June 23, 2015 12:49 AM2015-06-23T00:49:57+5:302015-06-23T00:49:57+5:30

सगुणा, चारसूत्री लागवड पध्दतीचा शेतकऱ्यांकडून अवलंब

The use of 'saguna' method is growing - District Agriculture Superintendent Arif Shah | ‘सगुणा’ पद्धतीचा वापर वाढतोय--जिल्हा कृषी अधीक्षक आरिफ शहा

‘सगुणा’ पद्धतीचा वापर वाढतोय--जिल्हा कृषी अधीक्षक आरिफ शहा

googlenewsNext

पेरणीचे क्षेत्र न भाजता गादीवाफे तयार करून त्यावर भात लागवड करण्यात येते. भात कापणीनंतर त्यावर वाल, कडवा यासारखी पिके घेता येतात. त्यासाठी टोकण पध्दती अवलंबली जाते. पहिल्यांदा नांगरणी करून गादीवाफे तयार केल्यानंतर पुढे तीन ते चार वर्षे नांगरणी करण्याची गरज भासत नाही. शिवाय शेतातील तण काढण्यासाठी तणनाशकांचा वापर केला जात असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये ‘सगुणा पध्दत’ प्रचलित होवू लागली आहे. चिपळूणात गतवर्षी पहिल्यांदा ही पध्दत अवलंबली गेली यावर्षी चिपळूण, संगमेश्वर, दापोली तालुक्यातील २०० एकर क्षेत्रावर सगुणा पध्दतीने भात लागवड करण्यात आली आहे. विद्यापीठाने अद्याप या पध्दतीस शिफारस केलेली नाही, मात्र याबाबत संशोधन सुरू आहे. शेतकऱ्यांना कमी खर्चात, कमी मनुष्यबळाचा वापर करून अधिक उत्पादन मिळविण्यासाठी सगुणा पध्दत लागवडीसाठी योग्य आहे.

रत्नागिरी जिल्ह्याची ओळख हापूसमुळे होत असून अर्थार्जनाचे ते प्रमुख पिक आहे. मात्र मुख्य पिक म्हणून भात पिक घेतले जाते. जिल्ह्यात प्रामुख्याने ७० हजार ३३४ हेक्टर क्षेत्रावर भात लावण्यात येते. सध्या पेरणीची शंभर टक्के कामे पूर्ण झाली आहेत. ७ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावर भात पेरणी करण्यात आली आहे. पारंपरिक पध्दतीने लागवड पध्दतीचा अवलंब करण्यात येत असला तरी सगुणा व चारसूत्री पध्दतीचा अवलंबही शेतकरी करू लागले आहेत. पाऊस चांगला पडत असल्यामुळे भाताची रोपे चांगली उगवून आली आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणीची कामे शेतकऱ्यांनी सुरू केल्यामुळे रोपांची वाढ चांगली होत आहे. त्यामुळे येत्या आठवड्यापासून भात लागवडीस प्रारंभ होण्याची शक्यता असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक आरिफ शहा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
प्रश्न : खते, बियाणांचा पुरवठा कितपत झाला आहे?
उत्तर : जिल्ह्यासाठी पेरणीकरिता ६ हजार २६५ क्विंटल भाताची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी महाबीजचे ३०५६.२१ क्विंटल तर खासगी १५३२.९६ क्विंटल मिळून एकूण ४ हजार ५८९.१७ क्विंटल भात बियाणे उपलब्ध झाले आहे. जिल्ह्यासाठी १८ हजार ७०० मेट्रीक टन खत मंजूर असून आतापर्यत १२ हजार ५९६.६० मेट्रीक टन खताची आवक झाली आहे. तालुका खरेदीविक्री संघाकडे खत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
प्रश्न : खतांचा तुटवडा भासतो का?
उत्तर : जिल्ह्यासाठी १८ हजार ७०० मेट्रीक टन खत मंजूर असून आतापर्यत १२ हजार ५९६.६० मेट्रीक खत उपलब्ध झाले आहे. युरिया खताचा अधिक वापर करण्यात येतो. ८ हजार ७४३ मेट्रीक टन युरिया खत उपलब्ध आहे. शेतकऱ्यांकडून युरियाला मागणी असल्यामुळे बाजारात सध्या युरियाचा तुटवडा जाणवत आहे. वास्तविक पावसामुळे खताची रेक येण्यास विलंब झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु उद्या (मंगळवारी) खताची उपलब्धता होणार असून शेतकऱ्यांना दोन दिवसात उपलब्ध होणार आहे.
प्रश्न : शेतकरी कोणत्या प्रकारची बियाणी प्राधान्यांने वापरतात?
उत्तर : प्रामुख्याने सुधारित भात बियाणांचा वापर सर्वाधिक केला जातो. ४ हजार १२५.७१ क्विंटल सुधारीत प्रकारच्या बियाणांचा वापर करण्यात आला आहे. २७२ क्विंटल संकरीत बियाणे वापरले आहे. तर एक हजार ८६७.२९ क्विंटल भात शेतकरी जुने बियाणे वापरले आहे. सुुधारीत बियाणे ३ ते ४ वर्ष वापरता येत असल्यामुळे शेतकरी त्याचा वापर करत आहेत.
प्रश्न : भातपिक लागवडीसाठी कोणती पध्दत अवलंबली जाते?
उत्तर : पेरणीपूर्वी भाजावळ केली जाते. पारंपरिक पध्दतीने लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल अधिक आहे. चारसूत्री पध्दतीनेही लागवड करण्यात येत आहे. ८ ते ९ टक्के क्षेत्रावर चारसूत्री पध्दतीने लागवड करण्यात येते. मात्र विद्यापीठ शिफारस नसलेली सगुणा पध्दत लोकांमध्ये प्रचलित होत आहे.
प्रश्न : भातबियाणांवरील अनुदान शेतकऱ्यांना मिळेल का?
उत्तर : गेली दोन वर्षे भात बियाणांवरील अनुदान बंद करण्यात आले आहे. मात्र तत्पूर्वी दोन वर्षे अनुदान देण्यात आले होते. प्रथम वर्ष ५० टक्के तर दुसऱ्यावर्षी ७५ टक्केचे अनुदान देण्यात आले असल्याने शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला होता. मात्र ते बंद करण्यात आले आहे.
प्रश्न : अवकाळीची नुकसान भरपाई कधी वितरीत करणार?
उत्तर : अवकाळी पावसामुळे आंबा काजू पिकाचे नुकसान झाल्याबद्दल शासनाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७९ कोटी ५३ लाख ६५ हजार २५० रूपयांचा निधी जाहीर केला आहे. पैकी ३३ कोटी ८१ लाख रूपये निधीचा पहिला हप्ता रत्नागिरी जिल्ह्यास प्राप्त झाला आहे. अवकाळीमुळे शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रूपयांप्रमाणे नुकसान भरपाईचे वितरण करण्यात येणार आहे. कृषी विभागाकडे नुकसान भरपाईचे परिपत्रक आले असले तरी भरपाईच्या रकमेची वितरण पूर्ण प्रक्रिया मात्र महसूल खात्याकडून राबवली जाणार आहे.
- मेहरुन नाकाडे

Web Title: The use of 'saguna' method is growing - District Agriculture Superintendent Arif Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.