उर्दू लोकराज्य विद्याथ्यार्साठी उपयुक्त : ईस्माईल नदाफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 06:34 PM2017-08-03T18:34:12+5:302017-08-03T18:34:21+5:30
सिंधुदुर्गनगरी दि. 0३ : आजच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी विविधांगी विषयाचे वाचन करणे महत्वाचे आहे. शालेय पाठ्यक्रमातील अभ्यासाच्या पुस्तकाव्यतिरिक्त क्षमता विकासासाठी वृत्तपत्र, चरित्र, कथा, कादंबरी, प्रवासवर्णन आदी प्रकारच्या वाचनाची विद्याथ्यार्नी आवड जोपासली पाहिजे. स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी तसेच स्वत:ची क्षमता विकसित करण्यासाठी उदूर्तून प्रकाशित होणारे लोकराज्य हे शासनाचे मुख्यपत्र अत्यंत उपयुक्त आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या उर्दू लोकराज्य मासिकाचे वर्गणीदार व्हावे असे आवाहन सावंतवाडी येथील जनरल उर्दू हायकूलचे मुख्याध्यापक ईस्माईल नदाफ यांनी केले.

सावंतवाडी येथील जनरल उर्दू हायस्कूल मध्ये आज जिल्हा माहिती कार्यालय सिंधुदुर्गच्या वतीने उर्दू लोकराज्य वाचन मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शकिल दरवास्कर, ईक्बाल मुल्लानी, ऊस्मान सिध्दीकी हे उपस्थित होते.
जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर यांनी उर्दू लोकराज्य बाबत सविस्तर माहिती यावेळी दिली. उर्दू हायस्कूल मधील शिक्षक शकिल दरवास्कर यांनी वाचनाचे महत्व विशद करताना कोणत्या प्रकारचे वाचन विद्यार्थी दशेत उपयुक्त असते या बाबत सविस्तर माहिती देऊन उर्दू लोकराज्यची उपयुक्तता यावेळी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. यावेळी उर्दू हायस्कूलचे विद्यार्थी- विद्यार्थ्यींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.