वैभव नाईकांच्या सुरक्षेत वाढ, केसरकरांनाही बसला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 19:31 IST2021-01-11T19:28:16+5:302021-01-11T19:31:06+5:30
Politics Sindhudurg- राज्य सरकारने अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली असून, याचा फटका सिंधुदुर्गमधील दोन नेत्यांना बसला आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची सुरक्षा पूर्णपणे हटविण्यात आली असून माजी मंत्री दीपक केसरकर यांना मात्र वाय प्लसवरून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. तर आमदार वैभव नाईक यांना एक्स दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आल्याने आश्चर्य व्यकत होत आहे.

वैभव नाईकांच्या सुरक्षेत वाढ, केसरकरांनाही बसला फटका
सावंतवाडी : राज्य सरकारने अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली असून, याचा फटका सिंधुदुर्गमधील दोन नेत्यांना बसला आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची सुरक्षा पूर्णपणे हटविण्यात आली असून माजी मंत्री दीपक केसरकर यांना मात्र वाय प्लसवरून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. तर आमदार वैभव नाईक यांना एक्स दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आल्याने आश्चर्य व्यकत होत आहे.
राज्य सरकारने राज्यातील नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला असून, यात अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. यात तत्कालीन भाजप सरकारमधील मंत्र्यांचा समावेश अधिक आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने माजी मंत्र्यांची सुरक्षाही कमी केली आहे.
नव्याने काहींना सुरक्षा पुरविण्यात आली आहे. सुरक्षेत कपात केलेल्यांमध्ये सिंधुदुर्गातील माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांंचा समावेश आहे. राणे यांंची सुरक्षा पूर्णपणे हटवल्याने आश्चर्य व्यक्त होत असून, मागील सरकारच्या काळात मात्र त्यांची सुरक्षा कमी केली होती. आमदार दीपक केसरकर हे मागील सरकारच्या काळात गृहराज्यमंत्री होते. त्यामुळे त्याना वाय प्लस दर्जाची सुरक्षा होती. आता वाय दर्जावर आणली.
आशिष शेलार झाले आक्रमक
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची सुरक्षा काढल्याने आमदार आशिष शेलार हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्रीपद भूषविणाऱ्या व्यक्तीची सुरक्षा कशी काय कमी केली जाऊ शकते असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच आगीशी खेळू नका, असा इशाराही महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.