वैभववाडीत धम्मचक्र प्रवर्तन दिन; गुणवंतांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 03:09 PM2018-10-16T15:09:59+5:302018-10-16T15:12:14+5:30
ज्या ज्या वेळी धम्मक्रांती झाली- त्या त्या वेळी प्रतिक्रांतीचा सामना करावा लागला. आजही ती सुरु आहे. त्यामुळे धम्मक्रांती पुढे नेणे सोडाच; ती टीकविण्याचे आपल्यापुढे फार मोठे आव्हान आहे; असे मत कॉम्रेड अंकुश कदम यांनी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमात केले.
वैभववाडी : ज्या ज्या वेळी धम्मक्रांती झाली- त्या त्या वेळी प्रतिक्रांतीचा सामना करावा लागला. आजही ती सुरु आहे. त्यामुळे धम्मक्रांती पुढे नेणे सोडाच; ती टीकविण्याचे आपल्यापुढे फार मोठे आव्हान आहे; असे मत कॉम्रेड अंकुश कदम यांनी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमात केले.
वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघाच्यावतीने येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनाय धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमात आयोजित करण्यात आला होता.
यावेळी समाज कल्याण सभापती शारदा कांबळे, संघाचे अध्यक्ष यशवंत यादव, शुभांगी यादव, सचिव बाळकृष्ण जाधव, बबनराव मौंदेकर, भगवान खांबाळेकर, सुभाष कांबळे, प्रा. डॉ. व्ही. ए. पैठणे, सुरेश यादव, अनंत कदम, गणपत वेंगसरकर, गंगाराम कांबळे आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, ह्यधम्मक्रांती पुढे नेऊन जग बदलायचे असेल तर आपण बुध्दांचे तत्त्वज्ञान समजून घेतले पाहीजे. यासाठी खूप वाचन करायला हवे. वाचन न करता कोणतीही चळवळ पुढे जात नाही. भगवान गौतम बुध्दांनी या देशात पहिली धम्मक्रांती केली. त्यानंतर सम्राट अशोकांनी धम्मचक्र गतिमान केले. डॉ. बाबासाहेबांनी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी पुन्हा या धम्मचक्राला गती दिली. तरुण पिढीने जागृत होणे गरजेचे आहे.
बुध्द पूजापाठाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमात तालुक्यातील इयत्ता दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी तसेच समाजातील विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. यावेळी समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, यशवंत यादव यांनी मनोगत व्यक्त केले. शुभेच्छा दिल्या. प्रस्ताविक बाळकृष्ण जाधव यांनी तर सूत्रसंचालन शरद कांबळे यांनी केले. प्रफुल्ल जाधव यांनी आभार मानले.
राज्य घटना संपविण्याचे कारस्थान
भारतीय राज्य घटना संपविण्याचे कारस्थान सध्या जोरात सुरु आहे. देशात जातीय अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. हे आपण समजून घेऊन चळवळीला बळ दिले पाहिजे. चळवळ जीवंत ठेवायची असेल; तर तरुण पिढीने स्वत:हून पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे, असे कॉम्रेड अंकुश कदम यांनी सांगितले