वैभववाडीवर शोककळा, गणेशोत्सवातील भेट ठरली शेवटचीच!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2018 05:40 AM2018-08-08T05:40:29+5:302018-08-08T05:40:42+5:30
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांबरोबर लढताना वीरगती प्राप्त झालेले मेजर कौस्तुभ प्रकाश राणे (रावराणे) शहीद झाल्याची बातमी आल्यानंतर वैभववाडी तालुक्याकर शोककळा पसरली.
वैभववाडी (जि. सिंधुदुर्ग) : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांबरोबर लढताना वीरगती प्राप्त झालेले मेजर कौस्तुभ प्रकाश राणे (रावराणे) शहीद झाल्याची बातमी आल्यानंतर वैभववाडी तालुक्याकर शोककळा पसरली. शहीद राणे यांनी तालुक्यातील सडुरे या त्यांच्या मूळ गावी गत गणेशोत्सवावेळी पत्नीसह आले होते. तिच त्यांची गावची शेवटची भेट ठरली. कौस्तुभ यांचे कुटुंब मीरा रोड येथे स्थायिक असले तरी सणासुदीला ते गावी येत होते. कौस्तुभ हे एकुलते होते. चार वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला आहे. त्यांचे वीरमरण आमच्या कुटुंबावर आघात असला तरी भारतमातेच्या रक्षणासाठी शहीद झाल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे माजी सरपंच विजय रावराणे यांनी व्यक्त केला.