संविधानातील मूल्यांचे जतन होणे आवश्यक

By Admin | Published: October 12, 2015 09:25 PM2015-10-12T21:25:49+5:302015-10-13T00:15:51+5:30

मिलिंद तांबे : स्वातंत्र्य, समता, बंधुता मूल्यांचे जतन व्हावे

Values ​​of the Constitution must be saved | संविधानातील मूल्यांचे जतन होणे आवश्यक

संविधानातील मूल्यांचे जतन होणे आवश्यक

googlenewsNext


चिपळूण : मार्गताम्हाणे एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. तात्यासाहेब नातू कला व वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग व मार्गताम्हाणे एज्युकेशन सोसायटी यांच्यातर्फे भारतीय संविधान या विषयावर अ‍ॅड. मिलिंद तांबे यांचे व्याख्यान झाले.
यावेळी प्राचार्य विजयकुमार खोत, संस्थेचे उपाध्यक्ष जयसिंग मोरे व प्राध्यापक उपस्थित होते. एन. बी. डोंगरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अ‍ॅड. तांबे यांनी संविधाननिर्मितीचा आढावा घेऊन संविधानानुसार जी यंत्रणा अस्तित्त्वात आली, त्याची माहिती दिली. केंद्र, राज्य संबंध मूलभूत अधिकार कर्तव्ये, न्यायालयीन प्रक्रिया आदींबाबत विस्तृतपणे माहिती दिली.
तसेच संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आदी मूल्यांचे जतन होणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
संविधानात योग्य सत्ता संतुलन साधल्यामुळे कोणताही एक घटक एकापेक्षा वरचढ होऊ शकत नाही. संविधानात आवश्यकतेनुसार दुरुस्ती करता येते. पण संविधानाची मूलभूत चौकट बदलता येत नाही, असे सांगितले. ज्यावेळी घटनात्मक पेचप्रसंग निर्माण होतो, त्यावेळी संविधानाचाच आधार घेतला जातो. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने संविधानाचे पालन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मिलिंद तांबे यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Values ​​of the Constitution must be saved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.