सामाजिक वनीकरण विभागामार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यात वनमहोत्सव

By Admin | Published: May 29, 2017 05:08 PM2017-05-29T17:08:16+5:302017-05-29T17:08:16+5:30

रोपांच्या वाटप व विक्री दर निश्चित, शाळांना सवलत

Vanamahotsav in Sindhudurg district through Social Forestry Department | सामाजिक वनीकरण विभागामार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यात वनमहोत्सव

सामाजिक वनीकरण विभागामार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यात वनमहोत्सव

googlenewsNext


आॅनलाईन लोकमत

सिंधुदुर्गनगरी दि. २९ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दि. ५ जून ते १५ आॅगस्ट या कालावधीत वन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत वनीकरणासाठी लोकांना उद्युक्त करण्यासाठी शासनामार्फत सवलतीच्या दराने रोपांचा पुरवठा करण्यात येत आहे.

वनमहोत्सव हा लोकांचा कार्यक्रम व्हावा व त्याचबरोबर जनतेला वनीकरणाचे महत्व पटवून द्यावे या दृष्टीने वनमहोत्सवाच्या कालावधीत सुधारीत केलल्या सवलतीच्या दराप्रमाणे रोपांचा पुरवठा करण्यात येतो. वनमहोत्सवाचा कालावधीत हा दि. ५ जून ते दि. ३१ आॅगस्ट असा आहे. वनमहोत्सव कालावधीत रोपांचे ठरविण्यात आलेले सवलतीचे दर निश्चित करण्यात आले आहेत. वनमहोत्सव कालावधीत वगळता इतर कालावधीत रोपांचा विक्री ना नफा, ना तोटा या तत्वावर करण्यात येणार आहे.

निश्चित केलेले दर आणि रोपे

भेंडी, पांगारा, खैर, अंजन, सूरु, काशिद, आॅस्ट्रलियन/ आकेशिया बाभूळ, करंज, सावर, विलायती चिंच, चिंच, आवळा, सिताफळ, शेवगा, जांभूळ, रायवळ आंबा, वड, बोर, हादगा, मोहा, कवठ, बेहडा, हिरडा, वड, उंबर, पिंपळ, बिबा, रामफळ- ६ रुपये रोपे दर. काजू, रातांबा, चारोळी -१५ रुपये रोपे दर. शिवण, बिजा, साग रोप- ७ रुपये रोपे दर. सिलव्हर ओक, स्पॅथोडीया, गुलमोहर, जॅकरांडा, अमलतास, अ‍ॅप्रोकार्पस, चाफा, रेन ट्री, पेल्टोफोरम, कांचन- ११ रुपये रोपे दर. डुपिंग, चंदन, अशोक-३0 रुपये रोपे दर. ख्रिसमस ट्री, पिवळा बांबू- ४५ रुपये रोपे दर, असे दर निश्चित केले आहेत.

शाळा, संस्था यांना सवलतीत रोप पुरवठा

शाळा, संस्था यांना रोप पुरवठा करण्याबाबत शासन निर्णय ग्राम विकास व जलसंधारण विभागाच्या दि. ६ आॅक्टोबर १९९७ मधील तरतुदी लागू राहतील. त्यानुसार पिशवीतील रोपांसाठी निधार्रीत केलेला दर प्रति रोप ५0 पैसे असा सवलतीचा राहणार आहे.

तालुका निहाय रोपवाटीकेची ठिकाणे

सावंतवाडी- च-हाठे, निरवडे. वेंगुर्ला-आडेली. कुडाळ- हुमरमळा वालावल, वेताळ बांबार्डे. मालवण- गोळवण, राठीवडे, नांदरुख. कुडाळ- मुळदे. कणकवली- कुंभवडे, दिगवळ. देवगड- दहीबांव, गवाणे. वैभववाडी- अर्चिणे, मांगवली

Web Title: Vanamahotsav in Sindhudurg district through Social Forestry Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.