वासंतिक संस्कार वर्गाचा समारोप
By admin | Published: May 9, 2016 08:14 PM2016-05-09T20:14:42+5:302016-05-09T20:16:29+5:30
शिबिरातील प्राविण्यप्राप्त छात्रांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, पुस्तक व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले
सावंतवाडी : येथील वेदशास्त्र संस्कृत पाठशाळेत गेले २० दिवस सुरू असलेल्या वासंतिक संस्कार वर्गाचा समारोप रविवारी झाला. यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर व नगरसेवक संजय पेडणेकर प्रमुख पाहुणे तर अध्यक्षस्थानी संस्थेचे सल्लागार विठ्ठल सप्रे होते. यावेळी शिबिरातील प्राविण्यप्राप्त छात्रांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, पुस्तक व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले. सहभागी छात्र पराग सप्रे्र, पालक गोविंद बर्वे, महेश सप्रे, आदींनी मनोगत व्यक्त केले. नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी छात्रांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास अध्यक्ष सुरेश पुराणिक, कार्यवाह रवींद्र गगनग्रास, खजिनदार विश्वेश्वर कोळंबेकर, आबा कशाळीकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रमोद भागवत, आभार उपाध्यक्ष मृणालिनी कशाळीकर यांनी मानले. (वार्ताहर)