वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प: कणकवलीत युवा सेनेने केला शिंदे सरकारचा निषेध!
By सुधीर राणे | Published: September 15, 2022 03:59 PM2022-09-15T15:59:39+5:302022-09-15T16:00:11+5:30
स्वतःला खोके महाराष्ट्राला धोके, ४० गद्दारांचा निषेध असो ' अशा घोषणांनी शिवसैनिक व युवासैनिकांनी परिसर दणाणून सोडला.
कणकवली: वेदांता- फॉक्सकॉन कंपनीचा १.५४ लाख कोटींचा महाराष्ट्राच्या १ लाख तरुणांना रोजगार मिळवून देणारा प्रकल्प राज्यातील शिंदे सरकारने गुजरातला पळवून लावल्याचा आरोप करीत त्याच्या निषेधार्थ गुरुवारी कणकवली शहर युवासेनेच्यावतीने अप्पासाहेब पटवर्धन चौकामध्ये स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
यावेळी ' निषेध असो, निषेध असो ', 'खोके सरकराचा निषेध असो, शिवसेना जिंदाबाद, ५० खोके एकदम ओके, स्वतःला खोके महाराष्ट्राला धोके, ४० गद्दारांचा निषेध असो ' अशा घोषणांनी शिवसैनिक व युवासैनिकांनी परिसर दणाणून सोडला.
शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्वाक्षरी मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला.