वेंगुर्ला भाजपाची कातकरी वस्तीत अनोखी भाऊबीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 06:28 PM2020-11-20T18:28:58+5:302020-11-20T18:30:44+5:30

diwali, bjp, vengurla, sindhudurgnews सर्वत्र दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत असताना भटक्या विमुक्त जातीतील कातकरी समाजातील लोकांना फराळ व मिठाई तसेच महिलांना साडी भेट देऊन अनोख्या पद्धतीने भाऊबीज साजरी करीत वेंगुर्ला भाजपाने समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला आहे. हा कार्यक्रम कॅम्प येथील कातकरी वस्तीवर पार पडला.

Vengurla BJP's unique brotherhood in Katkari | वेंगुर्ला भाजपाची कातकरी वस्तीत अनोखी भाऊबीज

कातकरी वस्तीतील लोकांना भाजपाच्यावतीने दिवाळीनिमित्त फराळ व साड्या भेट देण्यात आल्या.

googlenewsNext
ठळक मुद्देवेंगुर्ला भाजपाची कातकरी वस्तीत अनोखी भाऊबीज समाजापुढे निर्माण केला वेगळा आदर्श

वेंगुर्ला : सर्वत्र दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत असताना भटक्या विमुक्त जातीतील कातकरी समाजातील लोकांना फराळ व मिठाई तसेच महिलांना साडी भेट देऊन अनोख्या पद्धतीने भाऊबीज साजरी करीत वेंगुर्ला भाजपाने समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला आहे. हा कार्यक्रम कॅम्प येथील कातकरी वस्तीवर पार पडला.

कातकरी वस्तीतील लोकांना आपल्या घरून आणलेला फराळ व मिठाई देण्याचा उपक्रम वेंगुर्ला भाजपातर्फे गेली पाच वर्षे सातत्याने राबविला जात आहे. यावर्षी १८ महिलांना भाऊबीज म्हणून साड्या भेट देण्यात आल्या.

यावेळी अर्जुन पवार, राजू पवार, नितीन पवार, बाबी पवार, राज पवार, ध्रुपदा पवार, अंकुश निकम, अजय निकम, सुरेश पवार, चंदू पवार, शिवाजी पवार, काशिराम पवार, मोहन पवार, विक्रम निकम, जयराम पवार, उमेश निकम, विश्वास निकम, प्रकाश पवार यांच्यासह भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, नगराध्यक्ष दिलीप गिरप, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमके, महिला तालुकाध्यक्षा स्मिता दामले, नगरसेवक प्रशांत आपटे, पूनम जाधव, साक्षी पेडणेकर, सरपंच पपू परब तसेच बाबली वायंगणकर, प्रणव वायंगणकर, रफिक शेख, कीर्तीमंगल भगत, वृंदा गवंडळकर, राधा सावंत, पुंडलिक हळदणकर,
शरद मेस्त्री, महेंद्र घाडी आदी उपस्थित होते.

 

Web Title: Vengurla BJP's unique brotherhood in Katkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.