वेंगुर्ला- नवाबाग मांडवी खाडीत बचाव कार्याचे प्रात्यक्षिक; अतिवृष्टीचा इशारा असल्याने पोलीसांची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 13:55 IST2021-06-13T13:54:15+5:302021-06-13T13:55:06+5:30
Vengurla Police are ready on high alert :वेंगुर्ले पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे बचाव कार्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.

वेंगुर्ला- नवाबाग मांडवी खाडीत बचाव कार्याचे प्रात्यक्षिक; अतिवृष्टीचा इशारा असल्याने पोलीसांची तयारी
वेंगुर्ला : हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने शनिवारी सायंकाळी वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या वतीने येथील वेंगुर्ला नवाबाग मांडवी खाडीत “बचाव कार्याचे प्रात्यक्षिक” घेण्यात आले. वेंगुर्ले पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे बचाव कार्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक रुपाली गोरड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव गवरी, विजय कुंडेकर, हेड कॉन्स्टेबल वासुदेव परब, श्री. रमेश तावडे, पोलीस नाईक श्री. दादा परब, श्री. नितीन चोडणकर, पोलीस कॉन्स्टेबल श्री अमर कांडर, श्री खडपकर, श्री परशुराम सावंत, श्री परुळेकर तसेच होमगार्ड गिरप, केळुसकर आदी सहभागी झाले होते. अतिवृष्टी काळात नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.