वेंगुर्ले भाजपाच्या वतीने भर पावसात ग्रामीण रुग्णालयासमोर "लक्षवेध" आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 11:40 AM2021-06-17T11:40:50+5:302021-06-17T11:43:37+5:30
Bjp Vengurla Sindhudurg- निष्क्रीय आघाडी सरकारच्या विरोधात तसेच पालकमंत्र्यांच्या विरोधात वेंगुर्ले मध्ये बुधवारी भाजपच्या वतीने जोरदार घोषणा देण्यात आल्या. यामुळे येथील परिसर घोषणांनी दुमदुमुन गेला होता.तर भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वेंगुर्ले -निष्क्रीय आघाडी सरकारच्या विरोधात तसेच पालकमंत्र्यांच्या विरोधात वेंगुर्ले मध्ये बुधवारी भाजपच्या वतीने जोरदार घोषणा देण्यात आल्या. यामुळे येथील परिसर घोषणांनी दुमदुमुन गेला होता.तर भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वेंगुर्ले भाजपाच्या वतीने काल बुधवारी १६ जून रोजी वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालया समोर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेच्या दुरावस्थेकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भर पावसात लक्षवेध आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाचा तसेच पालकमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.तर यावेळी भाजपचे सर्व कार्यकर्ते आघाडी सरकारच्या विरोधात आक्रमक झाले होते.
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, महिला ता. अध्यक्ष स्मिता दामले, दादा केळुसकर, तालुका चिटणीस बाबली वायंगणकर, साई प्रसाद नाईक, रवींद्र शिरसाट, युवा मोर्चा शहराध्यक्ष प्रणव वायंगणकर, भाजपा शहरअध्यक्ष सुरेंद्र चव्हाण, नगरसेविका श्रेया मयेकर, प्रशांत प्रभू, वसंत तांडेल, दीपक नाईक,वृंदा गवंडळकर, वृंदा मोर्डेकर, स्मिता कोयंडे, ऍड सुषमा प्रभूखानोलकर, शरद मेस्त्री आदी उपस्थित होते.