सर्वांच्या सहकार्यातून वेंगुर्ले हायस्कूल महाराष्ट्रात नावलौकिक मिळवेल : रघुवीर मंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 10:41 AM2019-05-08T10:41:09+5:302019-05-08T10:42:21+5:30

आपल्या शाळेचे ऋण प्रत्येकाने व्यक्त करणे गरजेचे आहे. माजी विद्यार्थ्यांच्या संघटना जर आपल्या शाळेच्या भवितव्यासाठी हातभार लावत असतील, तर संस्था चालकांनीही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे. तरच आपली शाळा आदर्श व सुंदर होईल. सर्वांच्या सहकार्यातून वेंगुर्ले हायस्कूल महाराष्ट्रात नावलौकिक मिळवेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ उद्योजक रघुवीर मंत्री यांनी केले. ​​​​​​​

 Vengurle High School will get recognition in Maharashtra by all means: Raghuveer Minister | सर्वांच्या सहकार्यातून वेंगुर्ले हायस्कूल महाराष्ट्रात नावलौकिक मिळवेल : रघुवीर मंत्री

वेंगुर्ले हायस्कूलच्या नव्याने बांधलेल्या वर्गखोल्यांच्या उद्घाटनप्रसंगी व्हीएचएस असोसिएशनचे पदाधिकारी, संस्थेचे पदाधिकारी व मान्यवरांसह शिक्षक, माजी विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्दे सर्वांच्या सहकार्यातून वेंगुर्ले हायस्कूल महाराष्ट्रात नावलौकिक मिळवेल : रघुवीर मंत्री हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

वेंगुर्ले : आपल्या शाळेचे ऋण प्रत्येकाने व्यक्त करणे गरजेचे आहे. माजी विद्यार्थ्यांच्या संघटना जर आपल्या शाळेच्या भवितव्यासाठी हातभार लावत असतील, तर संस्था चालकांनीही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे. तरच आपली शाळा आदर्श व सुंदर होईल. सर्वांच्या सहकार्यातून वेंगुर्ले हायस्कूल महाराष्ट्रात नावलौकिक मिळवेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ उद्योजक रघुवीर मंत्री यांनी केले.

व्हीएचएस असोसिएशन या वेंगुर्ले हायस्कूलच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या संकल्पनेतून हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा व माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून बांधण्यात आलेल्या दोन वर्गखोल्यांचा उद्घाटन सोहळा हायस्कूलच्या सभागृहात रघुवीर मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झाला.

यावेळी वेंगुर्ले नगरपरिषदेचे नगराध्यक्ष दिलीप गिरप, प्रमुख पाहुणे उद्योजक ज्ञानेश्वर गावडे, व्हीएचएस असोसिएशनचे अध्यक्ष संजय पुनाळेकर, शाळेचे मुख्याध्यापक पी. डी. कांबळे, कोल्हापूर चर्च कौन्सिलचे शिक्षण समिती चेअरमन अ‍ॅड. डी. डी. धनवडे, संस्थेचे अध्यक्ष रमेश मोहिते, माजी मुख्याध्यापक एस. व्ही. चोकाककर, प्रॉपर्टी चेअरमन उदय विजापूरकर, सचिव जे. के. हिरवे, म्हाडाचे कोकण विभागाचे सदस्य सचिन वालावलकर, माजी विद्यार्थी डॉ. विवेक रायकर, असोसिएशनचे सल्लागार महादेव नाईक आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला नव्याने बांधण्यात आलेल्या दोन वर्गखोल्यांचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्हीएचएस असोसिएशनचे पदाधिकारी सुशील सावंत, ज्येष्ठ पत्रकार व शाळेचे माजी विद्यार्थी संजय मालवणकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच शाळेसाठी मदत केलेल्या दिलीप मोंडकर, माजी गटशिक्षणाधिकारी रमेश पिंगुळकर, विलास दळवी, अल्बर्ट डिसोजा, डॉ. राजन शिरसाट, सुभाष दीपनाईक, शाळेच्या माजी शिक्षिका शामा परब, वृंदा कांबळी, माजी मुख्याध्यापक एस. एस. काळे, का. हु. शेख, उन्मेश लाड, शकुंतला रायकर व नितीन बांदेकर यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

जे. जे. स्कूल आॅफ आर्टस्चे प्रा. सुनील नांदोसकर यांनी शाळेवर केलेल्या कवितेचे वाचन शिक्षक पी. एम. सामंत यांनी केले. यावेळी उद्योजक मंत्री यांनी ५१ हजार, तर नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी २५ हजार रुपयांची आर्थिक मदत शाळेसाठी केली. तसेच वेंगुर्ले हायस्कूलच्या दहावीच्या २००२ सालातील बॅचच्या व २००९ सालच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी वस्तू व देणगी स्वरुपात मदत केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. आनंद बांदेकर यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार नगरसेवक प्रशांत आपटे यांनी मानले.

शाळेच्या प्रगतीसाठी हातभार लावा

संजय पुनाळेकर म्हणाले, शाळेत सर्व शैक्षणिक सुविधा उपलब्ध असल्यास विद्यार्थ्यांना शिकताना आनंद मिळतो व त्यातूनच शाळेचा नावलौकिक करणारे विद्यार्थी घडतात. शाळा सुस्थितीत ठेवण्यासाठी माजी विद्यार्थी, पालकांनी हातभार लावावा, असे आवाहनही त्यांनी केले. नगराध्यक्ष गिरप यांनी असोसिएशनने माजी विद्यार्थी व दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून सुंदर वर्गखोल्या बनविल्याबाबत कौतुक केले.



अ३३ंूँेील्ल३२ ं१ीं

 

Web Title:  Vengurle High School will get recognition in Maharashtra by all means: Raghuveer Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.