अबब... वेंगुर्ल्याच्या समुद्रात सापडला ३०० किलो वजनाचा मोरी मासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 05:55 PM2019-01-31T17:55:03+5:302019-01-31T19:29:44+5:30

वेंगुर्ल्याच्या समुद्रात तब्बल 300 किलो वजनाचा मोरी मासा सापडला आहे. 

Vengurle-Kerwadi seized in the ocean, 300 kilograms of peacock fish ... | अबब... वेंगुर्ल्याच्या समुद्रात सापडला ३०० किलो वजनाचा मोरी मासा

अबब... वेंगुर्ल्याच्या समुद्रात सापडला ३०० किलो वजनाचा मोरी मासा

googlenewsNext
ठळक मुद्देवेंगुर्ले-केरवाडी समुद्रात सापडला तब्बल ३०० किलोचा मोरी मासा लिलावामध्ये व्यापाऱ्याने विकत घेतला मासा

वेंगुर्ले : वेंगुर्ल्याच्या समुद्रात तब्बल 300 किलो वजनाचा मोरी मासा सापडला आहे.  केरवाडी येथील रहिवासी संदीप चोडणकर हे बुधवारी (30 जानेवारी) संध्याकाळी मासेमारीसाठी आपल्या बोटीतून  खलाशांसमवेत खोल समुद्रात गेले असता त्यांच्या जाळ्यात भला मोठा मोरी मासा सापडला. हा मासा तब्बल 300 किलो वजनाचा आहे. सकाळी त्याला किनाऱ्यावर आणला असता पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

केरवाडीत एवढा मोठा मोरी मासा प्रथमच मिळाला आहे. दरम्यान एका व्यापाऱ्याने लिलावामध्ये हा मासा विकत घेतला असून तो मोठ्या हॉटेलमध्ये पाठवला जाणार आहे.

Web Title: Vengurle-Kerwadi seized in the ocean, 300 kilograms of peacock fish ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.