वेर्ले महादेवगड-आंबोली गिर्यारोहण मोहीम यशस्वी, थरारक अनुभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 16:59 IST2017-12-07T16:56:24+5:302017-12-07T16:59:31+5:30
अंगाचा थरकाप करणारे तीव्र चढाव आणि उतार, ऐन काठावरुन कशाचाही आधार न घेता चढणे व घसरत उतरण्याचा थरारक अनुभव, नयनरम्य निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत अनेक थरारक प्रसंग अनुभवत जनसेवा प्रतिष्ठान व वेंगुर्ले मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आखण्यात आलेली वेर्ले महादेवगड-आंबोली ही गिर्यारोहण मोहीम यशस्वीपणे पार पडली.

वेर्ले महादेवगड-आंबोली गिर्यारोहण मोहीम गिर्यारोहकांनी यशस्वी केली. (प्रथमेश गुरव)
वेंगुर्ले : अंगाचा थरकाप करणारे तीव्र चढाव आणि उतार, ऐन काठावरुन कशाचाही आधार न घेता चढणे व घसरत उतरण्याचा थरारक अनुभव, नयनरम्य निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत अनेक थरारक प्रसंग अनुभवत जनसेवा प्रतिष्ठान व वेंगुर्ले मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आखण्यात आलेली वेर्ले महादेवगड-आंबोली ही गिर्यारोहण मोहीम यशस्वीपणे पार पडली.
सरपंच चंद्र्रकांत राणे यांनी सर्व गिर्यारोहकांना शुभेच्छा देऊन पहाटे ५ वाजता मोहिमेला सुरुवात झाली. या मोहिमेत जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. संजीव लिंगवत, डॉ. प्रल्हाद मणचेकर, डॉ. नामदेव मोरे, प्रदीप वेंगुर्लेकर, भूषण नाबर, अशोक गोसावी, जय राणे, राजू नाईक, ज्ञानेश्वर राणे, तुकाराम राऊळ यांनी यशस्वी सहभाग घेतला. मोहीम यशस्वीतेसाठी वासुदेव राऊळ, द्वारका लिंगवत, रश्मी गावडे, उर्मिला सावंत, अश्विनी गोसावी, डॉ. सई लिंगवत, अमृता गोसावी यांनी परिश्रम घेतले.