महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्राला भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 07:26 PM2022-02-21T19:26:32+5:302022-02-21T19:26:56+5:30

वेंगुर्ला : प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे महाराष्ट्र राज्यातील कृषि विद्यापीठांच्या कुलगुरूची “कुलगुरू समन्वय समिती”ची सभा प्रादेशिक फळ ...

Vice Chancellor of Maharashtra Agricultural University visits Vengurla Regional Fruit Research Center | महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्राला भेट

महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्राला भेट

googlenewsNext

वेंगुर्ला : प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे महाराष्ट्र राज्यातील कृषि विद्यापीठांच्या कुलगुरूची “कुलगुरू समन्वय समिती”ची सभा प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे आयोजित करण्यात आली होती. सभेसाठी डॉ. बाळासाहेब सावत कोकण कृषी विद्यापीठ, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु उपस्थित होते.

या सभे दरम्यान त्यांनी वेंगुर्ले फळ संशोधन केंद्राचे संशोधनात्मक कार्य व प्रक्षेत्र व्यवस्थापनाबाबत सुरू असलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले.

वेंगुर्ले येथील या सभेच्या प्रारंभी डॉ. एस. डी. सावंत यांना कर्नल कमांडर’ हे आर्मीतील NCC विभागातून पद देण्यात आल्यामुळे कुलगुरू यांचा सत्कार कुलगुरू समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ. व्ही. एम. भाले यांच्या हस्ते करण्यात आला. तर सर्व उपस्थित कुलगुरूंचे स्वागत डॉ. एस. डी. सावंत कुलगुरू डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली यांनी केले. सभेत विविध विषयाची चर्चा झाल्यानंतर सर्व कुलगुरूंची प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रास भेट आयोजित करण्यात आली.

सर्वप्रथम येथील चार प्रयोगशाळेला भेट देवून येथील फळ प्रक्रिया प्रयोगशाळेत तयार केले जाणारे विविध प्रक्रिया युक्त पदार्थांची पाहणी सर्व उपस्थित कुलगुरूंनी केली. येथील उत्पादीत प्रक्रियायुक्त पदार्थाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. नंतर रोपवाटिका विभागाला त्यांनी भेट देवून कलमांची पाहणी केली. दुपारच्या सत्रात आंबा प्रक्षेत्राला भेट दिली. या प्रसंगी त्यांनी येथील लुपिन फाऊंडेशन व विद्यापीठाच्या सहकार्याने सुरू असलेल्या प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पांतर्गत विकसीत केलेल्या सुरंगीच्या कलमांची बांधणी पध्दती बाबत उपस्थितांनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.

सध्या बदलत्या हवामानात आंबा पिकांमध्ये अति पर्जन्यमानामध्ये चांगली येणारी फळ पिके डयुरीयन, रानबुतान, लोगान, मँगोस्टीन इत्यादी फळ पिकांची पाहणी करून विद्यापीठाने चालू केलेल्या या संशोधनाबाबत त्यांनी विद्यापीठाच्या कार्याची प्रशंसा केली. त्यानंतर येथील कृषि पर्यटन अभ्यासक्रमाला भेट देवून या प्रकल्पाची पाहणी केली.

दरम्यान या भेटी प्रसंगी वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. बी. एन. सावंत, डॉ. व्ही. एस. देसाई, किटकशास्त्रज्ञ, डॉ. एम. एस. गवाणकर, उद्यानविद्यावेत्ता (आबा), डॉ.  एम. बी. कदम, चार प्रयोगशाळा प्रमुख, डॉ. ए. वाय. मुंज, क. किटकशास्त्रज्ञ डॉ. एम. पी. सणस, क. उद्यानविद्यावेत्ता, डॉ.  एस. व्ही. देशमुख, क. मृदशास्त्रज्ञ, एल. एस. खापरे, क. काजू पैदासकार आदी उपस्थित होते.

Web Title: Vice Chancellor of Maharashtra Agricultural University visits Vengurla Regional Fruit Research Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.