Video : नितेश राणेंचा पोलीस ठाण्यात गोंधळ, मला अटक केली तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 10:58 PM2019-07-04T22:58:41+5:302019-07-04T23:20:22+5:30
नितेश राणे आणि त्यांच्या 40 ते 50 समर्थकांवर कलम 353, 342, 332, 324, 323, 120(A), 147, 143, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला आहे.
कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांना जबाबदार धरत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना नितेश राणेंनी चिखलाच्या पाण्याने आंघोळ घातली. या प्रकारानंतर नितेश राणेंवर गुन्हा दाखल झाला आहे. नितेश राणेंना पोलीस ठाण्यात हजर केले असता, त्यांनी पोलिसांशी बोलताना गोंधळ घातला. तुम्हाला काय करायचंय ते करा, तुम्ही मला अटक केली तर कणकवलीकर मरतील, असे म्हणत राणेंनी पोलिसांना अटक न करण्याचे आवाहन केले.
नितेश राणे आणि त्यांच्या 40 ते 50 समर्थकांवर कलम 353, 342, 332, 324, 323, 120(A), 147, 143, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला आहे. नितेश राणेंनीही पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. मात्र, पोलीस ठाण्यात गेल्यानंतर राणेंसह त्यांच्या कार्यर्त्यांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. तसेच, तुम्हाल जे करायचंय ते करा, पण मला अटक केल्यास ते जिंकतील, असे म्हणत शिवसेना नेत्यांकडे इशारा केला.
आमदार नितेश राणे यांच्यासह नगराध्यक्ष समीर नलावडे आणि स्वाभिमान कार्यकर्त्यांनी शेडेकर यांना गडनदी पुलाला बांधून ठेवले होते. एवढेच नव्हे तर सर्वसामान्य जनता रोज चिखल मारा सहन करते आहे. तुम्ही पण त्याचा अनुभव घ्या, असे म्हणत शेडेकर यांच्या डोक्यावर चिखलाच्या बादल्या कार्यकर्त्यानी ओतल्या. कणकवलीनगरी तुंबवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असे विचारत आमदार नितेश राणे यांच्यासह स्वाभिमान कार्यकर्त्यांनी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना गडनदी पूल ते जानवली नदीपुलापर्यंत पायी चालत नेऊन चिखल आणि खड्ड्यांची वस्तुस्थिती दाखवली. यावेळी येत्या दोन दिवसांत सर्व्हिस मार्ग सुरक्षित करण्याचे आश्वासन प्रकाश शेडेकर यांनी दिले होते. कणकवली शहरातील महामार्गाच्या दुरवस्थेबाबत गुरुवारी सकाळी 10.15 वाजण्याच्या सुमारास कणकवली येथील अप्पासाहेब पटवर्धन चौक येथून आमदार नितेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, संजय कामतेकर, माजी नगराध्यक्षा मेघा गांगण, शहराध्यक्ष राकेश राणे, नगरसेवक अभिजित मुसळे, संदीप नलावडे, युवक स्वाभिमान जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, बबन हळदिवे, गटनेते संजय कामतेकर, विठ्ठल देसाई, सभापती सुजाता हळदिवे, वागदे माजी सरपंच संदीप सावंत, पंचायत समिती सदस्य मिलींद मेस्त्री, निखील आचरेकर, सचिन पारधीये, किशोर राणे आदी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाहणी सुरू केली.
#WATCH Nitesh Rane at Kankavali police station earlier today after being arrested for throwing mud on an engineer: Whatever you want to do, do it tomorrow. If you arrest me today, they will win. And people of Kankavali will keep dying like this. #Maharashtrapic.twitter.com/nUwo9zc9Pg
— ANI (@ANI) July 4, 2019