Video : अरे नको ना निलेश, त्या वकिलांना बोलूदे ना; आमदार नितेश राणेंचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 02:26 PM2022-02-02T14:26:54+5:302022-02-02T14:45:49+5:30

Nitesh Rane Video Viral : मंगळवारी सिंधुदुर्ग कोर्टासमोर नितेश राणेंची गाडी पोलिसांनी अडवली. त्यामुळे निलेश राणे चांगलेच तापले. पोलीस आणि निलेश राणे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.

Video: Oh no, Nilesh, don't talk, let do to talk those lawyers; MLA Nitesh Rane's video goes viral | Video : अरे नको ना निलेश, त्या वकिलांना बोलूदे ना; आमदार नितेश राणेंचा व्हिडीओ व्हायरल

Video : अरे नको ना निलेश, त्या वकिलांना बोलूदे ना; आमदार नितेश राणेंचा व्हिडीओ व्हायरल

googlenewsNext

आमदार नितेश राणे यांची काल सिंधुदुर्ग कोर्टाबाहेर गाडी अडवल्यामुळे पोलीस आणि माजी खासदार निलेश राणे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. यावेळी निलेश राणे यांनी आक्रमक बनत पोलिसांशी हुज्जत घातली. त्यावेळी नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांची यांनी आपल्या भावाला म्हणजेच निलेशला बोलण्यास अटकाव करून वकिलांना बोलू दे असं सांगत असलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

मंगळवारी सिंधुदुर्ग कोर्टासमोर नितेश राणेंची गाडी पोलिसांनी अडवली. त्यामुळे निलेश राणे चांगलेच तापले. पोलीस आणि निलेश राणे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. निलेश राणे पोलिसांशी हुज्जत घालायला लागले. नितेश राणे स्थानिक आमदार आहेत. त्यांना सुप्रीम कोर्टानं अटकेपासून संरक्षण दिलं आहे, दहा दिवसांची मुदत सुप्रीम कोर्टाने दिली आहे, कोणत्या अधिकाराखाली त्यांना अडवत आहात असा सवाल निलेश राणेंनी पोलिसांना विचारला. पोलिसांची दादागिरी सुरु आहे असा आरोपही नितेश राणे यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी केला. दुसरीकडे नितेश राणेंचं मात्र काहीतरी वेगळंच सुरु होत. नितेश राणे दडपणाखाली असल्याचं पाहायला मिळालं. जाऊ दे ना निलेश नको ना, वकिलांना बोलू दे ना असं नितेश राणे बोलायला लागले. 

सत्र न्यायालय ते सुप्रीम कोर्ट राणेंचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आलाय. त्यांना कधीही अटक होऊ शकते. जामीन मिळावा म्हणून वकीलही राणेंनी बदलला, आता नितेश राणेंसाठी ज्येष्ठ वकील सतिश मानेशिंदे बाजू लढवतायत. पण अटकेची भिती अजूनही नितेश राणेंना आहे. नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह विधान केलं होतं म्हणून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. नारायण राणे जेवत असतानाच सिंधुदुर्ग पोलिसांनी त्यांना उठवलं होतं आणि अटकही केली होती. आता असाच काहीसा प्रकार आपल्यासोबतही घडू नये म्हणून तर नितेश राणे घाबरत नाहीत ना, म्हणून तर नितेश राणे बचावात्मक पवित्रा घेत नाहीत ना अशी चर्चा सुरु झालीय. शिवसैनिक तर उघडपणे हा व्हिडीओ शेअर करत नितेश राणेंची खिल्ली उडवतायत. 

Web Title: Video: Oh no, Nilesh, don't talk, let do to talk those lawyers; MLA Nitesh Rane's video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.