ओडीसी नृत्यांतून सिंधुदुर्गातील दशावताराचे दर्शन

By admin | Published: December 24, 2015 10:18 PM2015-12-24T22:18:17+5:302015-12-25T00:08:11+5:30

सावंतवाडी पर्यटन महोत्सव : स्मृतीरेखा दास यांचे नृत्य भारावून टाकणारे

View of Dasavatara in Sindhudurg from Odissi dance | ओडीसी नृत्यांतून सिंधुदुर्गातील दशावताराचे दर्शन

ओडीसी नृत्यांतून सिंधुदुर्गातील दशावताराचे दर्शन

Next

सावंतवाडी : पर्यटन महोत्सवांच्या पहिल्या दिवशी आंतरराष्ट्रीय किर्तीच्या ओडीसी नृत्यांगना स्मृतीरेखा दास यांनी आपल्या वेगवेगळ्या अदाकारांनी रसिकांना चांगलीच भुरळ घातली. गंगातरंग बरोबरच सिंधुदुर्ग दशावताराप्रमाणेच ओडीसी दशावतारही त्यांनी आपल्या नृत्यांतून सादर करीत प्रेक्षकांची मने जिंकली.
सावंतवाडी पर्यटन महोत्सवांचा बुधवार हा पहिला दिवस होता. आणि पहिल्याच दिवशी उद्घाटन कार्यक्रमानंतर महोत्सवात खरी जाण भरली ती ओडीसी नृत्यांगना स्मृतीरेखा दास यांनी. जर्मनी, अमेरिका, दक्षिण आफ्रिका आदी देशात ओडीसी नृत्य सादर करून आपली ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणाऱ्या दास यांनी सावंतवाडी महोत्सवात प्रथमच आपला कार्यक्रम सादर करीत प्रेक्षकांना भुरळ घातली
गंगातरंग या ओडीसी नृत्यावर वेगवेगळ्या कला सादर करीत असतना त्यांनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली. त्यांच्या वेगवेगळ्या अदा तसेच त्यांची रूपेही कार्यक्रमात भुरळ घालत होती. सिंधुदुर्गमध्ये ज्याप्रमाणे दशावतार सादर केला जातो त्याचप्रमाणे तो ओडीसामध्येही सादर केला जातो. हा दशावतार कसा असतो हेही दास यांनी कलेतून दाखवून दिले. सिंधुदुर्गमध्ये दशावतारांचे अनेक विषय असतात. पण ओडीसीमध्येही दशावतार आहे. आजच्या नृत्यांतून श्रीकृष्ण भगवानाची दहा रूपे कशी उलगडण्यात आली हेही त्यांनी दाखवून दिले आहे. स्मृतीरेखा दास यांनी ओडीसी नृत्यांचे दोन प्रकार सादर केले. याला प्रेक्षकांनीही चांगलीच दाद दिली. तर नगराध्यक्ष बबन साळगावकर व उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी खास त्यांचे कौतुक केले. विशेष म्हणजे स्मृतीरेखा दास यांचे पती सिंधुदुर्ग जिल्ह्यातच एका कंपनीत उच्च पदावर आहेत. त्यामुळे स्मृतीरेखा दास या सावंतवाडीतच असून त्यांनी येथे राहून ही कला जिवंत ठेवली आहे.(प्रतिनिधी)

लावणीची रसिकांच्या मनाला भुरळ
पर्यटन महोत्सवात ओडीसी नृत्यानंतर लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पुणे येथील पूजा पूनम गु्रपने तर एकापेक्षा एक अशा लावण्या सादर करीत रसिकांचा वन्स मोअर मिळवला. आता वाजले की बारा या लावणीला तर प्रेक्षकांनी टाळ्या आणि शिट्यांनी दाद दिली. कार्यक्रमांचे बच्चू पांडे यांनी उत्कृष्ठ निवेदन करीत कार्यक्रमात रंगत आणली.

Web Title: View of Dasavatara in Sindhudurg from Odissi dance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.