विक्रमी दर : पावसाने मारले, पीक परिस्थितीपुढे हरले तरीही...

By admin | Published: March 15, 2015 12:22 AM2015-03-15T00:22:08+5:302015-03-15T00:22:22+5:30

उत्पादन घटल्याने रत्नागिरीच्या काजूला सोन्याचा भाव

Vikramkhi Rate: Even though it loses its crop due to rain ... | विक्रमी दर : पावसाने मारले, पीक परिस्थितीपुढे हरले तरीही...

विक्रमी दर : पावसाने मारले, पीक परिस्थितीपुढे हरले तरीही...

Next

मेहरून नाकाडे ल्ल रत्नागिरी
अवकाळी पावसाचा फटका बसला असला, तरी एकूणच हवामानातील बदलांमुळे काजू पिकाची उत्पादकता घटल्याचे दिसून येत आहे. उत्पादन कमी असल्यामुळे काजू बीच्या दरामध्ये मात्र तेजी दिसून येत आहे. सध्या ९० ते १०५ रूपये दराने काजू बी खरेदी करण्यात येत आहे. मात्र, हा दर काजूच्या दर्जानुसारच ठरत आहे.
जिल्ह्यातील ९१ हजार ५३० हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड करण्यात आली आहे. ८३ हजार २९२ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. गतवर्षी १ लाख ४ हजार ८४७ मेट्रीक टन काजू उत्पादन प्राप्त झाले होेते. यावर्षी पावसाळा लांबल्याने थंडीही लांबली त्यामुळे मोहोर प्रक्रियाच उशिरा सुरू झाली. त्यामुळे गतवर्षी ८५ ते ७५ रूपये किलो दराने काजू खरेदी करण्यात येत होता. मात्र, यावर्षी १०५ रूपयांपासून काजू बीला दर उपलब्ध झाला. काजूच्या दर्जावर दर ठरत आहे. हायब्रीड काजू १०० ते १०५ रूपये दराने खरेदी करण्यात येत आहे.
काजू पिकावर पावसाचा परिणाम जाणवणार नसल्याचे बागायतदारांचे म्हणणे आहे. मात्र, काजू बी पिकल्यानंतर पाऊस आल्यास त्याचा परिणाम जाणवू शकतो. हवामानामुळे काजू बीच्या उत्पादनाबरोबर दर्जावरही परिणाम झालेला दिसून येत आहे. बी आकाराने लहान दिसून येत आहे. त्यामुळे प्रति किलोला १६५ ते १७० नग इतकी मोठ्या आकाराची बी प्राप्त होते. तर छोट्या आकाराची १८० ते २०० नग बी
प्राप्त होते. अवकाळी पावसामुळे सध्या काजू बीमध्ये १३ ते १६ टक्के मॉश्यूरायझर आढळत आहे. त्यामुळे ही बी वजनाला जास्त भरत आहे. एकूण हवामानामुळे ४० टक्के पिकाचे नुकसान झाले असले तरी ६० टक्के पिक हातात येईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पावसामुळे मोहोरावर बुरशीचा प्रादूर्भाव झाला होता. परंतु, वातावरणात उष्मा भरपूर असल्याने बुरशीचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे यावर्षी शेवटच्या टप्प्यातीलही काजू हातात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काजू विक्रेते निवडक दर्जेदार काजू बी खरेदी करतात. त्यामुळे शहरात आणून बी निवडूनच काट्याला लावली जाते. यावर्षी उत्पादनावर परिणाम झाल्याने दर टिकून राहतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत
आहे.

Web Title: Vikramkhi Rate: Even though it loses its crop due to rain ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.