ग्रामस्थ आक्रमक: मायनिंग विरोधात आजगाव धाकोरे वासियाची एकजूट 

By अनंत खं.जाधव | Published: September 24, 2022 07:50 AM2022-09-24T07:50:46+5:302022-09-24T07:51:50+5:30

ग्रामस्थ आक्रमक: मायनिंग ला थारा नाही ग्रामसभेत एकमुखी ठराव

Villagers Aggressive: Ajgaon Dhakore residents unite against mining | ग्रामस्थ आक्रमक: मायनिंग विरोधात आजगाव धाकोरे वासियाची एकजूट 

ग्रामस्थ आक्रमक: मायनिंग विरोधात आजगाव धाकोरे वासियाची एकजूट 

Next

सावंतवाडी : आजगाव धाकोरे परिसरात होऊ घातलेल्या मायनिंग ला ग्रामस्थांनी तीव्र विरोध करत मायनिंग विरोधात पंचक्रोशीत एकजूट करण्याचा निर्णय घेतला.तसेच मायनिंग कंपनीला ना हरकत दाखला न देण्याचा ठराव एकमताने घेण्यात आला. तालुक्यातील आजगाव, धाकोरे, मळेवाड तर वेंगुर्ला तालुक्यातील साेन्सुरे, आरवली, सखैलखाेल, बांध या गावात एका कंपनीने मायनिंग करण्यासाठी मायनिंग पूर्वसर्वेक्षण करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी   सर्वेक्षण करण्यासाठी 'ना हरकत दाखला' मागितला आहे. तसे पत्र ग्रामपंचायतींना देण्यात आले मात्र सोन्सुरे ग्रामपंचायतीने  ना हरकत दाखला न देण्याचा ठराव घेतला तर शुक्रवारी आजगाव- धाकोरे ग्रामपंचायतीनेही   ना हरकत दाखला न देण्याचा ठराव करताना या दोन्ही गावांमध्ये कंपनीला कोणत्याही परिस्थितीत मायनिंग करू दिले जाणार नसल्याचा निर्धारही व्यक्त केला आहे.

ग्रामसभेला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. आजगाव सरपंच सुप्रिया वाडकर यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा पार पडली यावेळी ग्रामसभेत ना हरकत दाखला देऊ नये असे ग्रामस्थानी एक मताने सांगितले. याबाबतचा ठराव केशव गाेगटे यांनी मांडला. त्याला अनंत दिनकर पांढरे यांनी अनुमोदन दिले. 

सरपंच सुप्रिया वाडकर यांनी मायनिंग प्रकल्प हानिकारक आहे. यामुळे बागायती नष्ट होण्याबरोबर परिसरातील पाण्याचे स्रोत नष्ट होणार आहेत. लोकांच्या उपजीविकेचे साधनच मायनिंगमुळे हिरावुन घेतले जाणार आहे. रेडीतील मायनिंगची परिस्थिती सर्वांसमोर आहे. ही परिस्थिती पाहता कंपनीला सर्वेक्षण करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून ना हरकत दाखला दिला जाणार नाही. तसेच कंपनीने भविष्यात मायनिंग करण्याचे ठरवल्यास त्याला ठामपणे विरोध केला जाईल असे यावेळी स्पष्ट केले.

या प्रकल्पाला सर्व ग्रामस्थांनी विरोध दर्शवला. प्रकल्पाच्या बाजूने कुणी बोलण्यास पुढे आले नाही. प्रकल्पाला विरोध म्हणून ग्रामसभेने संघर्ष समिती स्थापन करण्याचा निर्णय एकमताने घेतला या संघर्ष समितीच्या माध्यमातून मायनिंगला विरोध करण्यात येणार आहे. या ग्रामसभेला  उपसरपंच हेमांगी तेली, ग्रामपंचायत सदस्य शंकर गोवेकर, अंकिता वाडकर, प्रेरणा पांढरे, साधना कळसुलकर, गजानन काकतकर, बाळकृष्ण हळदणकर, ग्रामसेवक एस् आर. गवस, गोविंद भगत, एस वि आजगावकर, एस एन आरोंदेकर, जगन्नाथ काळाेजी,पोलीस पाटील निकिता पोखरे तर ग्रामसभेला प्रसाद  झांटये, विलासनंद मठकर, सुशीला आजगावकर, अबी पराब, विश्वजीत शेटकर, सुनील वाडकर, गुरुदत्त नातू, प्रवीण मुळीक, आनंद पांढरे, श्याम बेहरे,एकनाथ शेटकर, चंद्रकांत पांढरे वासुदेव शिंदे, प्रवीण मुळीक, हरेश झांटय़े, गजा पांढरे आदीसह साडेतीनशेहून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते. 

Web Title: Villagers Aggressive: Ajgaon Dhakore residents unite against mining

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.