ग्रामस्थांनी डंपर वाहतूक रोखली, भीतीने उडी मारल्याने पादचारी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 07:15 PM2019-12-26T19:15:34+5:302019-12-26T19:20:25+5:30

निरवडे येथे वेगवान डंपर अंगावर येत असल्याने गटारात उडी मारणारा पादचारी जखमी झाला. गावातून होणारी डंपर वाहतूक जीवघेणी ठरत असल्याने वाहतूक ग्रामस्थांनी रोखली.

Villagers prevented dumper traffic, and pedestrians were injured due to jumping | ग्रामस्थांनी डंपर वाहतूक रोखली, भीतीने उडी मारल्याने पादचारी जखमी

ग्रामस्थांनी डंपर वाहतूक रोखली, भीतीने उडी मारल्याने पादचारी जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देग्रामस्थांनी डंपर वाहतूक रोखली डंपरच्या भीतीने उडी मारल्याने पादचारी जखमी

सावंतवाडी : निरवडे येथे वेगवान डंपर अंगावर येत असल्याने गटारात उडी मारणारा पादचारी जखमी झाला. गावातून होणारी डंपर वाहतूक जीवघेणी ठरत असल्याने वाहतूक ग्रामस्थांनी रोखली.

मायनिंगची डंपरने बेदकारपणे वाहतूक सुरू आहे. यामुळे मळगाव ते मळेवाड व साटेली ते मळेवाड मार्गावरील पादचारी, शाळकरी मुले, वाहनधारक यांच्यासाठी डोकेदुखी होत असून, ही वाहतूक जीवघेणी ठरत आहे. बुधवारी निरवडे येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरच्या भीतीने पादचारी महादेव धुरी यांनी आपला जीव वाचविण्यासाठी गटारात उडी मारली. यात ते जखमी झाले आहेत.

या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी मायनिंग डंपर वाहतूक रोखून धरली. या डंपर वाहतुकीबाबत असलेले नियम धाब्यावर बसवून वाहतूक सुरू आहे. यावर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, महसूल अधिकारी, जिल्हा वाहतूक पोलीस दुर्लक्ष करीत असल्याने अधिकारी सुस्त असून, जनता त्रस्त आहे, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या वाहतुकीवर वेळीच निर्बंध न आणल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांतून दिला जात आहे.

Web Title: Villagers prevented dumper traffic, and pedestrians were injured due to jumping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.