लोकसभा निवडणुकीनंतर विनायक राऊत पूर्णपणे रिकामी असतील, दिपक केसरकरांचा टोला

By अनंत खं.जाधव | Published: December 25, 2022 04:42 PM2022-12-25T16:42:39+5:302022-12-25T16:43:24+5:30

विधानसभा मतदार संघातून शिंदे गटातून निवडून आलेल्या सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग येथील ग्रामपंचायीच्या सरपंचाचा सत्कार समारंभ सावंतवाडीत पार पडला त्यावेळी ते बोलत होते.

Vinayak Raut will be completely empty after the Lok Sabha elections, says Deepak Kesarkar | लोकसभा निवडणुकीनंतर विनायक राऊत पूर्णपणे रिकामी असतील, दिपक केसरकरांचा टोला

लोकसभा निवडणुकीनंतर विनायक राऊत पूर्णपणे रिकामी असतील, दिपक केसरकरांचा टोला

googlenewsNext

सावंतवाडी : खासदार विनायक राऊत यांना काय काम राहिले नाही. शिवसेनेत जो उठाव झाला त्याला राऊत जबाबदार आहेत. आता तर ते आमच्या सरपंचांना धमक्या देताहेत पण लोकसभा निवडणुकी नंतर ते पूर्ण वेळ मोकळे असतील, असा टोला राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी खासदार राऊत यांना हाणला 

विधानसभा मतदार संघातून शिंदे गटातून निवडून आलेल्या सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग येथील ग्रामपंचायीच्या सरपंचाचा सत्कार समारंभ सावंतवाडीत पार पडला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष बबन राणे,गणेशप्रसाद गवस, नितीन मांजरेकर,प्रेमानंद देसाई,सचिन देसाई,माजी जिल्हा परिषद सदस्य गीता कुडाळकर आदि उपस्थित होते.

केसरकर म्हणाले,गावाच्या विकासासाठी कधीही निधी कमी पडू देणार नाही. तसेच गावातील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा आपला मानस आहे. काही सरपंच आहे विरोधकांची निवडून आले आहेत पण आपण गावाचा असा कायापालट करू की त्यांनाही वाटले पाहिजे की आपण शिंदे गटात गेलं पाहिजे त्यासाठी जास्तीत जास्त विकास कामे करण्याचा मानस ठेवा असे आवाहन मंत्री केसरकर यांनी केले.



तसेच खासदार विनायक राऊत हे आमच्या सरपंच व सदस्य यांना खोटी आमिषे दाखवून फोडण्याचे प्रयत्न बंद करावेत, अन्यथा येणार्‍या खासदारकीच्या निवडणूकीत आम्ही त्यांना घरी बसवू, असा इशारा केसरकर यांनी दिला. लवकरच शिंदे गटाचे संपर्कमंत्री नेमायचे आहेत. यावेळी आपल्याला सिंधुदुर्गची जबाबदारी मिळण्याची अपेक्षा आहे. तसे झाल्यास जिल्ह्याला निश्चितच फायदा होईल,भाजप व शिंदे गट मिळून जिल्ह्याचा कायापालट करून असे ही त्यांनी यावेळी सांगितले.

या निमित्ताने  मोर्ले सरपंच संजना धुमासकर,सदस्य गायत्री गवस,गौरी देसाई,दिप्ती मणेरीकर,केर सरपंच रुक्मिणी नाईक,सदस्य मेघना देसाई,यशवंत देसाई,लक्ष्मण घारे,गायत्री देसाई,लक्ष्मी धुरी,प्रियांका देसाई,झोळंबे सरपंच विशाखा नाईक,सदस्य विनिता गवस,संजना गवस,उज्वला कांबळे,विशाल गवस,गोविंद राउत,पिकुळे सरपंच आप्पा गवस,सासोली सरंपच बळीराम शेट्ये,मांगेल सरपंच सुनंद नाईक,कोलझर सरपंच सुजल गवस,झरेबांबर अनिल शेटकर,घोटगे सरपंच भक्ती दळवी,अस्मिता गवस,घोटगेवाडी श्रीनिवास शेटकर आदींचा सन्मान करण्यात आला.

सावंतवाडी तालुक्यातील साटेली तर्फ सातार्डा श्रावणी नाईक,सदस्य राजन नाईक,रघुनाथ नाईक,शंकर नाईक सोनुर्ली सरपंच नारायण हीराप,सदस्य भालू गावकर,प्रविण गाड,आप्पा पालयेकर,सातुळी बावळाट सरपंच सोनाली परब,चराठे सरपंच प्रचिता कुबल,निरवडे सरपंच सुहानी गावडे,सदस्य अंगारीका गावडे,माजी सरपंच सदा गावडे,संतोष गावडे,संजू गावडे न्हावेली ग्रामपंचायत सदस्य अक्षय पार्सेकर,रमेश निर्गुण,माजी सरपंच प्रतिभा गावडे आदींचा सन्मान करण्यात आला.

Web Title: Vinayak Raut will be completely empty after the Lok Sabha elections, says Deepak Kesarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.