महाराष्ट्र विधान मंडळ अंदाज समितीची सिंधुदुर्गला भेट
By Admin | Published: April 24, 2017 07:36 PM2017-04-24T19:36:29+5:302017-04-24T19:36:29+5:30
विकास कामाची पहाणी केली
सिंधुदुर्गनगरी, दि. २१ : महाराष्ट्र विधान मंडळ अंदाज समितीने आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध विभागाच्या विकास कामांची पाहणी केली.
या समितीचे चेअरमन आमदार उदय सामंत यांच्?या समवेत समिती सदस्य आमदार सर्वश्री विरेंद्र जगताप, बाळासाहेब मुरकुटे, चरण वाघमारे, डॉ. मिलिंद माने या वेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील अव्वर सचिव विजय कोमटवार, अप्पर जिल्हाधिकारी रविंद्र सावळकर, जिल्हा परिषचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, उप विभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार, विकास सुर्यवंशी तसेच खाते प्रमुख उपस्थित होते.
वेंगुर्ला बंदर येथील धूप प्रतिबंधक बंधारा, बंदारानजिक उभारण्यात येणार झुलता पूल, वेंगुर्ला नगरपालिकेचा कचरा प्रक्रिया प्रकल्प, वेंगुर्ला फळ संशोधन केंद्र, कोचरा येथील कोळंबी उत्पादन प्रकल्प आदी कामांची पाहाणी समिती सदस्यांनी केली.