सौभाग्यवतीचे वाण म्हणून झाडे भेट

By admin | Published: January 30, 2017 11:42 PM2017-01-30T23:42:57+5:302017-01-30T23:42:57+5:30

हळदीकुंकू कार्यक्रमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश : तळेरेतील सुप्रिया वाड्येंचा अनोखा उपक्रम

Visit the trees as fortunate varieties | सौभाग्यवतीचे वाण म्हणून झाडे भेट

सौभाग्यवतीचे वाण म्हणून झाडे भेट

Next



नांदगाव : अलीकडे हळदीकुंकू समारंभाला सौभाग्यवतीचे वाण हे एखादी वस्तू देण्याची परंपरा नव्याने सुरू झाली आहे. हळदी कुंकवासोबतच अनेक वस्तू वाटण्याची नवी पद्धत रूढ झाली. त्यात मग स्टील अथवा प्लास्टिकच्या वस्तू असतात. मात्र तळेरे येथील सुप्रिया वाड्ये यांनी हळदीकुंकू समारंभातून पर्यावरण रक्षणाचा संदेश देत अनेकांपुढे एक आदर्श ठेवला आहे. विशेष म्हणजे त्यांनी यावर्षी केळी, पपई व इतर मिळून सुमारे ३०० पेक्षा जास्त झाडांचे वाटप केले.
याबाबत माहिती घेतली असता त्या म्हणाल्या की, हळदीकुंकू सर्वत्र होतच असते. त्यातून सर्वानाच उपयोगी पडेल असे काहीतरी द्यावे असे वाटले. त्यामुळे मागच्यावेळी मिनी तगर ही झाडे वाटप केली. मात्र, सगळ््यांकडेच झाडे लावायला जागा उपलब्ध होत नाही. फ्लॅटमध्ये राहणारे अनेकजण कुंडीमध्येही झाडे लावून आपली आवड जोपासतात. त्याकरिता यावर्षी केळी, पपई व शोभिवंत झाडांचे वाटप करण्यात आले. अलीकडील काही वर्षात हळदीकुंकू समारंभात सौभाग्यवतीचे वाण म्हणून भांडी दिली जातात आणि भांडी किंवा इतर वस्तू नित्याच्याच झाल्या असल्याने प्रत्येकाला उपयोगी पडेल आणि त्याचा योग्य विनिमय होईल असे काहीतरी द्यावे असे मनात होतेच. त्यासाठी प्रत्येकाच्या घरी आपल्या सर्वांच्या उपयोगी पडेल असे झाड असावे यासाठी केळीचे झाड द्यावे असे ठरवले. त्यातून पर्यावरण रक्षणही होईल, झाडांची संख्या वाढीस लागेल. झाडही द्यावे ते प्रत्येकाला लावता आले पाहिजे आणि उपयोगीही पडले पाहिजे असा दुहेरी हेतू ठेवून ज्यांच्या घरामागे परसबाग आहे अशांसाठी केळी व पपईचे झाड आणि जे फ्लॅटमध्ये राहतात त्यांना शोभिवंत झाडे देण्यात आली. विशेष म्हणजे या वेगळ््या प्रकारच्या उपक्रमाचे महिलांकडून स्वागत झाले आणि कौतुकही वाटले.
केळी, पपई हीच झाडे देण्यामागचे कारण सांगताना त्या म्हणाल्या की, गणपतीसह इतर हिंदू सणांमध्ये केळीच्या पानाचे खूप महत्त्व आहे. त्यासाठी टिश्यू कल्चर जातीच्या केळीची रोपे यावर्षी वाटली. या केळीच्या झाडाला ११ महिन्यात केळी लागतात. तसेच एका रोपातून चार रोपे वाढतात. शिवाय केळी व पपई ही झाडे वाढण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागत नाही. तसेच ती औषधीही असतात, सर्वसामान्यांना अनेकदा घरगुती कार्यक्रमात उपयोगीही पडतात. (वार्ताहर)

Web Title: Visit the trees as fortunate varieties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.