Gram Panchayat Election: कणकवली तालुक्यात आठ केंद्रांवर रविवारी होणार मतदान; ईव्हीएम मशीन सील
By सुधीर राणे | Published: November 2, 2023 01:50 PM2023-11-02T13:50:42+5:302023-11-02T13:52:51+5:30
कणकवली : कणकवली तालुक्यातील ओटव व बेळणे खुर्द या दोन ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणुक तर हळवल आणि वारगाव ग्रामपंचायतींच्या जागांसाठी ...
कणकवली: कणकवली तालुक्यातील ओटव व बेळणे खुर्द या दोन ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणुक तर हळवल आणि वारगाव ग्रामपंचायतींच्या जागांसाठी पोट निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी आठ मतदान केंद्रांवर येत्या रविवारी (दि.५) मतदान होणार आहे. यामुळे तहसीलदारांच्या उपस्थितीत उमेदवार तसेच त्यांचे प्रतिनिधी यांच्यासमोर ईव्हीएम मशीनची पाहणी करून ती सील बंद करण्यात आली.
ओटव, बेळणे खुर्द येथे सरपंच पदासाठी मतदान होणार आहे. याठिकाणी ३ मतदान केंद्र तर हळवल व वारगाव येथे प्रत्येकी १ मतदान केंद्र असणार आहे. कणकवली तहसील कार्यालयात आज, ईव्हीएम मशीन सीलबंद करण्याची प्रक्रिया झाली. यावेळी तहसीलदार दीक्षांत देशपांडे, महसुल नायब तहसीलदार शिवाजी राठोड, निवासी नायब तहसीलदार गौरी कट्टे यांच्यासह ग्रामपंचायत उमेदवार व ग्रामस्थ उपस्थित होते.
सीलबंद केलेली मतदान यंत्रे स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आली. शनिवारी (दि.४) मतदान यंत्रे घेऊन अधिकारी व कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना होणार आहेत. त्यादृष्टीने निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात येणार आहे.