संवेदनशील गावात जनता पोलिसांचा सुसंवाद अखंड

By Admin | Published: February 12, 2015 11:55 PM2015-02-12T23:55:10+5:302015-02-13T00:57:24+5:30

शिवाजी बांगर : नवा पायंडा पाडल्यामुळे गावात गुन्हे नाहीत

In the vulnerable village, public police interaction unbroken | संवेदनशील गावात जनता पोलिसांचा सुसंवाद अखंड

संवेदनशील गावात जनता पोलिसांचा सुसंवाद अखंड

googlenewsNext

शिवाजी गोरे-दापोली -जनता व पोलीस यांच्यातील दरी कमी करण्यात बुरोंडी दूरक्षेत्राच्या सहाय्यक उपनिरीक्षकांना यश आले आहे. आपल्या खाक्याच्या भीतीने तंटे कमी करण्याऐवजी बरोंडी दूरक्षेत्रातील लोकांची मने जिंकत जनता व पोलीस यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण करण्यात बुरोंडी दूरक्षेत्राचे सहाय्यक उपनिरीक्षक शिवाजी बांगर यांना यश आले आहे. गेल्या दोन वर्षात या दूरक्षेत्रात दखलपात्र वा अदखलपात्र एकही गुन्हा दाखल नाही. जिल्ह्यात एकही गुन्हा दाखल नसलेले बुरोंडी दूरक्षेत्र पहिलेच दूरक्षेत्र आहे.
बुरोंडी हे गाव संवेदनशील गावाच्या यादीत होते. या गावातील गुन्ह्याचे प्रमाण बऱ्यापैकी होते. पोलीस व जनता यांच्यात सुसंवादाची अत्यंत गरज होती. २०१३ साली सहाय्यक उपनिरीक्षक बांगर यांच्याकडे बुरोंडी दूरक्षेत्राची जबाबदारी सोपवण्यात आली. बुरोंडी दूरक्षेत्राची जबाबदारी घेतल्यानंतर नागरिकांच्या, ग्रामस्थांच्या भेटीगाठीवर बांगर यांनी भर दिली. येथील गुन्हेगारीचे स्वरुप, गुन्हे कशामुळे घडतात. गुन्ह्याचे कारण कशात आहे. कोणत्या प्रकारची गुन्हे घडतात, या परिस्थितीचा अभ्यास केला. दूरक्षेत्रातील गावात जाऊन बैठका घेतल्या.
बुरोंडी दूरक्षेत्रातील गावागावात बैठका घेऊन जनता व पोलीस यांच्यातील सुसंवाद वाढविला. त्यामुळे पोलीस आपला मित्र असल्याची भावना जनतेच्या मनात निर्माण झाली. पोलिसांबद्दल सहानुभीती निर्माण झाल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीवर अंकुश ठेवण्यात पोलिसांना यश आले.
सन २०१३पासून संवेदनशील गावात जनता व पोलिसांच्या सुसंवादातून शांततेचे पर्व सुरु झाले असून, बुरोंडी दूरक्षेत्रात गेल्या दोन वर्षांत एकही गुन्हा दाखल झालेलाच नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील बुरोंडी दूरक्षेत्र पहिलेच दूरक्षेत्र असून, ज्यामध्ये एकही गुन्हा दाखल नाही. शांतता निर्माण झाल्याने गुन्ह्याचे प्रमाण कमी झाले आहे.


बुरोंडी दूरक्षेत्रात गेल्या दोन वर्षांत एकही गुन्हा दाखल नाही. या दूरक्षेत्रात पूर्वीपेक्षा गुन्हेगारीचे प्रमाणच खूप कमी झाले. याचे सर्वाधिक समाधान वाटत आहे. या गावातील सरपंच प्रदीप राणे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुनील कुळे, पंचक्रोशी अध्यक्ष प्रदीप सुर्वे, बाजारपेठ अध्यक्ष सुधीर पोवार, मुस्लिम समाजाची मंडळी व ग्रामस्थांच्या सहकायाने दूरक्षेत्रात शांततेचे पर्व सुरु झाले. बुरोंडी दूरक्षेत्राची जबाबदारी दिली. त्यांना अभिप्रेत काम करण्याचा प्रयत्न केला.
- शिवाजी बांगर, सहाय्यक उपनिरीक्षक बुरोंडी दूरक्षेत्र


शांततेचे नवे पर्व; बुरोंडी दूरक्षेत्रात एकही गुन्हा नाही.
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाची चमकदार कामगिरी.
प्रबोधनाच्या नव्या पर्वातून बुरोंडीतील तंट्यांना पूर्णविराम.
गुन्हेगारी प्रवृत्तीवर अंकुश ठेवण्यात यश.
बुरोंडीत घेतल्या गेल्या बैठकांवर बैठका.
२०१३ पासून संवेदनशील गावात पोलीस व जनता यांच्यात सुसंवाद.
दखल वा अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद नाही.
जिल्ह्यात पहिले दूरक्षेत्र.

Web Title: In the vulnerable village, public police interaction unbroken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.