वाफोली धरण ‘ओव्हर फ्लो’

By admin | Published: July 25, 2016 12:25 AM2016-07-25T00:25:50+5:302016-07-25T00:25:50+5:30

सह्याद्री पट्ट्यात संततधार सुरुच : पर्यटकांसाठी धबधब्यांचे आकर्षण

Wafoli Dam 'Over Flow' | वाफोली धरण ‘ओव्हर फ्लो’

वाफोली धरण ‘ओव्हर फ्लो’

Next

ओटवणे : सह्याद्री पट्ट्यात पावसाची संततधार सुरू आहे. यंदा पाऊस नियमित असल्याने वाफोली धरण जुलैच्या सुरूवातीस तुडुंब भरले आहे. वाढत जाणाऱ्या पावसामुळे धरण ओव्हरफ्लो झाले असून त्यामुळे निसर्गाचा एक नवीन आविष्कार येथे पहावयास मिळत आहे. धरणातून बाहेर पडणाऱ्या पाण्याने सुंदर, मनमोहक असा धबधबा येथे निर्माण झाला असून हे ठिकाण सध्या पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे.
बांदा-दाणोली या मार्गावर वाफोली येथील हे धरण आणि निर्माण झालेला सुंदर धबधबा प्रवाशांच्या तसेच पर्यटकांच्या दृष्टीस पडतो.
गोवा राज्यातून आंबोली या थंड हवेच्या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांची गर्दी सध्या वाढत आहे. आंबोलीत उंचावरून फेसाळत कोसळणारे धबधबे पाहण्यासाठी, आंघोळीची मजा लुटण्यासाठी गोवा तसेच अन्य ठिकाणच्या पर्यटकांची ये-जा सुरू आहे.
आंबोली येथे जाण्यासाठी बांदा-दाणोली हा पर्यायी आणि सुलभ रस्ता असल्याने या मार्गानेच गोवा राज्यातील पर्यटक प्रवास करतात. या मार्गावर वाफोली येथे धरणाच्या पाण्याच्या विसर्गाने आकर्षक असा धबधबा निर्माण झाला आहे. त्यामुळे वाटसरू पर्यटक नकळत आणि कुतुहलाने काही क्षण या धबधब्याखाली मौजमस्ती करतात. अगदी रस्त्यालगतच हा धबधबा निर्माण झाल्याने पर्यटकांची पावले नकळत याठिकाणी वळत आहेत.
निसर्गाचा हा आविष्कार वाफोली येथील वैशिष्ट्य ठरत असून, या ठिकाणानजीक साफसफाई व काही प्रमाणात दुरूस्ती केल्यास पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न होणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)
साफसफाई आवश्यक : शासनस्तरावरुन प्रयत्नांची गरज
४निसर्गाचा हा आविष्कार वाफोली येथील वैशिष्ट्य ठरत असून, या ठिकाणानजीक साफसफाई व काही प्रमाणात दुरूस्ती केल्यास पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न होणे गरजेचे आहे.
 

Web Title: Wafoli Dam 'Over Flow'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.