१०४ गावात अद्याप प्रसाधनगृहाची प्रतीक्षा

By admin | Published: February 17, 2016 12:56 AM2016-02-17T00:56:24+5:302016-02-17T01:09:01+5:30

चालक-वाहकांची गैरसोय : केवळ ९९ ठिकाणीच सोय, कोणताही तालुका परिपूर्ण नाही

Waiting for the toilet in 104 villages yet | १०४ गावात अद्याप प्रसाधनगृहाची प्रतीक्षा

१०४ गावात अद्याप प्रसाधनगृहाची प्रतीक्षा

Next

रत्नागिरी : शासनाकडून गावागावातून निर्मल व हागणदारीमुक्त योजना राबवत आहे. परंतु जिल्ह्यातील १०४ गावात रात्रवस्तीसाठी घेऊन जाणाऱ्या एस. टी. चालक - वाहकांसाठी प्रसाधनगृहाची सुविधा उपलब्ध झालेली नाही. जिल्ह्यातील नऊ आगारातून एकूण २०३ रात्रवस्त्यांपैकी केवळ ९९ ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राज्य परिवहन महामंडळातर्फे नऊ आगारांतील २०३ निरनिराळ्या खेडेगावात रात्रवस्तीसाठी गाड्या पाठवण्यात येतात. वस्तीसाठी गावात जाणाऱ्या वाहक, चालकांसाठी प्रसाधनगृहाची व निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वेळोवेळी जिल्हा परिषदेकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतु १०४ गावे या सुविधेपासून वंचित आहेत.
दापोली तालुक्यातील चार गावांमध्ये पणदेरी मोहल्ला, उन्हवरे, हर्णै, पोफळवणे, मंडणगड तालुक्यातील ३ गावांमध्ये आवाशी घराडी, भोळवली, म्हाप्रळ, खेड तालुक्यातील ९ गावांपैकी चोरवणे, शिरगाव, पन्हाळजे, तुळशी, बिरमणी, सवणस, कासई, खोपीशिरगाव, कुरवळजावळी गावात सुविधा उपलब्ध नाहीत.
चिपळूण तालुक्यातील २० गावांमध्ये वाघिवरे, स्वयंदेव, गांग्रई, वीर, करंबवणे, धायजेवाडी, तळवडे गोवळ, तिवडी, कोसबी, मालदोली, मुर्तवडे, नायशीवडेरू, पातेपिलवली, गुढेकोंढवी, तळसर, सावर्डे, तोंडली, नांदिवसे, ताम्हणमळा तसेच गुहागर येथील पांगारी, पाभरे येथे असुविधा आहे. संगमेश्वर तालुक्यातील ३० गावांमध्ये चिखली, पाचांबे, पिरंदवणे, आंबवली, करजुवे, कानरकोंड, कातुर्डी, निवळी, नेदरवाडी, देवडे, तांबेडी, मुचरी, बामणोली, ओझरे (खडीकोळवण) मासरंग, नायरीतिवरे, चाफवली भटाचा कोंड, कुळये पुनर्वसन, फणसट, पाचांबे येडगेवाडी, बडदवाडी, धामापूर (करजुवे), कासेपेढांबे, तळेकांटे, देवळेवाणेवाडी, परचुरी, चोरवणे, घाटीवळे, मांजरे, माखजन गावात शौचालय सुविधा नाही. रत्नागिरी तालुक्यातील निरूळ, हरचेरी, मांडवकरवाडी अहिल्यानगर, मिरवणे, ढवळेवाडी, रेववाडी, मालगुंंड, गावडेआंबेरे, कशेळीकोंड, डोर्ले तसेच लांजा तालुक्यातील इसवली, इंदवटी, हर्चे, आगवेकोट गावातही शौचालय असुविधा आहे. राजापुरातील २२ गावामध्ये भालावली, कुंभवडे, ताम्हाणे, चुनाकोळवण, नाणार, मोरोशी, तुळसुंदे, शिरसे, हातदे, वेत्ये, घाडीवाडी, काजिर्डा, झर्ये, आजिवली, गुरववाडी नाटे, आंबोळगड, बेणगी, आडिवरे गावात असुविधा आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Waiting for the toilet in 104 villages yet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.