वॉल्टरचे मूर्तिकाम वाखाणण्याजोगे

By admin | Published: September 3, 2015 11:25 PM2015-09-03T23:25:22+5:302015-09-03T23:25:22+5:30

कलेला नसतो धर्म : ख्रिश्चन असूनही जोपासली कला

Walter's tangible carnival | वॉल्टरचे मूर्तिकाम वाखाणण्याजोगे

वॉल्टरचे मूर्तिकाम वाखाणण्याजोगे

Next

प्रथमेश गुरव- वेंगुर्ले  मनुष्याच्या कलेला तोड नाही असं म्हटलं जातं, मग तो कोणत्याही जाती-धर्माचा असो. याचा प्रत्यय एका गणपतीच्या चित्रशाळेत येत आहे. एकिकडे जाती-धर्म, आरक्षण यावरुन समाजात दुही माजविण्याचे प्रयत्न होत असताना कलेला मात्र कुठला धर्म नसतो, हे वारंवार वेगवेगळ्या उदाहरणातून समाजासमोर आले आहे.वेंगुर्ले-साकववाडा येथील वॉल्टर फास्कू डिसोजा हा ख्रिश्चन धर्मिय युवक आपली मूर्ती कामाची कला लोकांपर्यंत पोहोचवताना दिसत आहे. वेंगुर्ले-कुंभवडा येथील प्रशांत पानकर यांच्या गणपतीच्या चित्रशाळेत वॉल्टर हा गणपती बनवित आहे. होतकरु असलेला वॉल्टर उपजिविकेसाठी लहान-मोठी मजुरीची कामे करीत आहे. या कामाबरोबरच आपल्यातील कलेलाही व्यासपिठ मिळावे यासाठी त्याची धडपड सुरु आहे. दरवर्षी नाताळ सणाला घरासमोर येशू ख्रिस्ताच्या जन्माचा सुबक देखावा बनविणे हा त्याचा छंद. ३ वर्षापूर्वी दिवाळीला भलामोठा नरकासूर बनवून त्याने आपली कला लोकांसमोर आणली. एवढ्यावर तो न थांबता आपणही गणपती बनवावा ही त्याची इच्छा होती. परंतु वॉल्टर हा दुसऱ्या धर्मातील असल्याने त्याची गणपती बनविण्याची इच्छा कशी पूर्ण होईल, कुठला मूर्तिकार आपल्याला मूर्ती शाळेत कामाला ठेवेल हा यक्ष प्रश्न त्याच्यासमोर होता. पण, त्याचे प्रश्न अखेर मार्गी लागून वेंगुर्ले-कुंभवडा येथील युवा मूर्तिकार प्रशांत पानकर यांनी आपल्या चित्रशाळेत वॉल्टरला एक वर्षापूर्वी कामासाठी ठेवले. सुरुवातीला लहान लहान कामे करीत वॉल्टर याने मूर्तिकामाचे ज्ञान आत्मसात केले. आता तर तो चांगल्यापैकी मूर्तीकाम तसेच रंगकामही करतो. ख्रिश्चन धर्मातला असून सुद्धा आपल्याला एक चांगला मूर्तिकार होण्याचे त्याचे स्वप्न असल्याचे वॉल्टर याने यावेळी सांगितले. वॉल्टर याची मूर्ती कामाची जिद्द व आत्मविभास पाहून तो पुढे नक्कीच चांगला मूर्तिकार होईल यात शंकाच नाही.

Web Title: Walter's tangible carnival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.