प्रभाग रचना जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2016 12:52 AM2016-01-18T00:52:25+5:302016-01-18T00:52:25+5:30

कुडाळ नगरपंचायत : सोमवारी हरकती मागविल्या

Ward structure announcement | प्रभाग रचना जाहीर

प्रभाग रचना जाहीर

Next

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीची प्रभागरचना जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी जाहीर केली असून, प्रभाग रचनेसंदर्भात सोमवार १८ जानेवारी रोजी हरकती मागविण्यात आल्या आहेत. तर प्रभाग रचनेचा नकाशा नगरपंचायत कार्यालयात लावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आली आहे. नवीन झालेल्या प्रभागांची रचना, प्रभागाचे नाव, आरक्षण व प्रभागाची व्याप्ती यानुसार पुढीलप्रमाणे :
प्रभाग १ : कविलकाटे-सर्वसाधारण-कविलकाटे मस्जिद मोहल्ला कविलगावची हद्द.
प्रभाग २ : भैरववाडी -सर्वसाधारण - भैरववाडी पानबाजार भागश:
प्रभाग ३ : लक्ष्मीवाडी -सर्वसाधारण
प्रभाग ४ : बाजारपेठ-नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग -बाजारपेठ पानबाजार भागश:
प्रभाग ५ : कुडाळेश्वरवाडी-सर्वसाधारण (महिला)-कुडाळेश्वरवाडी शिवाजीनगर, कुडाळेश्वरवाडी अंशत:
प्रभाग ६ : गांधी चौक-नागरिकांचा मागास प्रवर्ग - बाजारपेठ प्रभावळकरवाडा.
प्रभाग क्र. ७ : आंबेडकरनगर -अनुसूचित जाती (महिला) - आंबेडकरनगर भोसलेवाडी माठेवाडी अंशत:
प्रभाग क्र. ८ : मस्जिद मोहल्ला -सर्वसाधारण-मस्जिद मोहल्ला करोलवाडी तुपटवाडी
प्रभाग क्र. ९ : नाबरवाडी-नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला)-गोधडवाडी, नाबरवाडी, दत्तनगर.
प्रभाग क्र. १० : केळबाईवाडी-सर्वसाधारण - केळबाईवाडी औदुंबरनगर.
प्रभाग क्र. ११ : वाघसावंत टेंब गणेशनगर - सर्वसाधारण महिला - इ वाघसावंत टेेंब गणेशनगर, पोलीस स्टेशन.
प्रभाग क्र. १२ : हिंदू कॉलनी-सर्वसाधारण महिला-हिंदू कॉलनी, पोलीस लाईन जडयेचाळ परिसर,
प्रभाग क्र. १३ : श्रीरामवाडी-सर्वसाधारण महिला-लक्ष्मीवाडी, भागशाळा श्रीरामवाडी.
प्रभाग क्र. १४ : अभिनव नगर-नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)-अभिनव नगर, विठ्ठलवाडी, आेंमकार नगर,
प्रभाग क्र. १५ : मधली व खालची कुुंभारवाडी - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)- मधली कुुंभारवाडी, खालची कुंभारवाडी, इंद्र्रप्रस्थनगर.
प्रभाग क्र. १६ : एमआयडीसी परिसर- सर्वसाधारण महिला- वेंगुर्लेकरवाडी, एमआयडीसी, वरची कुंभारवाडी. प्रभाग क्र. १७ : सांगिर्डेवाडी- सर्वसाधारण - सांगिर्डेवाडी उद्यमनगर परिसर, अशा प्रकारची भाग रचना करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे. (प्रतिनिधी)

बिगुल वाजणार : जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
नव्यानेच झालेल्या कुडाळ नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी १७ प्रभाग रचना जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकातून जाहीर केली असून, आरक्षण व प्रभागरचना झाल्यामुळे आता कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकांचे बिगुल येत्या काही दिवसात वाजणार, हे निश्चित.

Web Title: Ward structure announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.