कणकवली येथे जाचक अटी असलेला कचरा प्रकल्प होऊ देणार नाही : सुशांत नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 04:27 PM2019-01-21T16:27:56+5:302019-01-21T16:29:31+5:30

जाचक अटी लादलेला हा प्रकल्प आम्ही होवु देणार नाही असे प्रतिपादन कणकवली नगरपंचायतीमधील शिवसेनेचे गटनेते नगरसेवक सुशांत नाईक यानी दिला आहे.

Waste conditions will not be allowed in Kankavali: Sushant Naik | कणकवली येथे जाचक अटी असलेला कचरा प्रकल्प होऊ देणार नाही : सुशांत नाईक

कणकवली येथे जाचक अटी असलेला कचरा प्रकल्प होऊ देणार नाही : सुशांत नाईक

Next
ठळक मुद्देजाचक अटी असलेला कचरा प्रकल्प होऊ देणार नाही सुशांत नाईक यांचे प्रतिपादन

कणकवली : कणकवली येथे कचरा निर्मुलनासाठी ए.जी .डॉटर्स कंपनीचा 900 कोटीचा न होणारा प्रकल्प घालण्याचा घाट घातला जात आहे. अत्यंत जाचक अटी या प्रकल्पाच्या करारपत्रामध्ये नमुद करण्यात आल्या आहेत.

कणकवली नगरपंचायतीवर यानिमित्ताने 100 कोटीचा बोजा ठेवण्याचे काम या प्रकल्पाच्या माध्यमातुन नगरपंचायतीचे सत्ताधारी करत आहेत. त्यामुळे हा प्रकल्प आणुन दाखवावाच असे आमचे आव्हान या प्रकल्पाच्या समर्थकांना असुन जाचक अटी लादलेला हा प्रकल्प आम्ही होवु देणार नाही असे प्रतिपादन कणकवली नगरपंचायतीमधील शिवसेनेचे गटनेते नगरसेवक सुशांत नाईक यानी दिला आहे.

कणकवली येथील विजय भवन येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक सुशांत नाईक यांनी ए.जी. डॉटर्सच्या या 900 कोटी प्रकल्पाबाबतचे करारपत्र सादर करत या करारपत्रात नमुद केलेल्या जाचक अटींचा ऊहापोह करताना या अटी भविष्यात कणकवलीवासियांसाठी धोक्याची घंटा असल्याचे त्यानी सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत नगरसेविका मानसी मुंज, माही परुळेकर, योगेश मुंज, सुजीत जाधव, बाळु पारकर उपस्थित होते.

नगरसेवक सुशांत नाईक म्हणाले, ए.जी.डॉटर्स कंपनी कणकवलीत 900 कोटीची गुंतवणुक करत हा भव्यदिव्य कचरा प्रकल्प राबवित आहे. या प्रकल्पाचे भूमिपुजन झाले असुन याबाबतचा करारनामा आमच्या हाती असुन यावर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, बांधकाम सभापती, मुख्याधिकारी यांच्या सह्या आहेत.

175 मेट्रीक टन कचरा प्रतिदिन या प्रकल्पासाठी लागणार असुन जर्मन तंत्रावर आधारीत हा प्रकल्प आहे. यासाठी 25 वर्षाकरीता नगरपंचायतीने लिजवर हा प्रकल्प स्विकारला आहे. नगरपंचायतीने कचरा उपलब्ध करुन देण्याची हमी दिली असुन यासाठी जिल्ह्यातील नगरपरिषदा त्याचप्रमाणे हॉस्पिटल, मोठ्या ग्रामपंचायती गृहीत धरल्या आहेत.

हा कचरा प्रोजेक्ट प्लॅनपर्यंत आणण्याची जबाबदारी त्या त्या संस्थेची राहणार आहे. 175 मेट्रीक टनापैकी निदान 80 टक्के कचरा जमा झालाच पाहीजे असेही मान्य करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सदर प्रकल्प अर्धवट काम झाले असता रद्द झाल्यास जवळ पास 100 कोटीची भरपाई या कंपनीला द्यावी लागणार आहे. त्याचप्रमाणे प्रकल्प पुर्ण होऊन बंद झाल्यास 300 कोटी रुपये भरपाईपोटी द्यावे लागणार आहेत. हा प्रकल्प नगरपंचायतीला नेमके काय देणार याबाबतचा स्पष्ट उल्लेख करार पत्रात नाही.

या प्रकल्पातुन 60 मेगावॅट विजनिर्मिती दररोज होणार असुन प्रति तासाला 60 हजार युनिट धरल्यास विज वितरण कंपनी देत असलेल्या अडीज रुपये दराप्रमाणे तासाला दिड लाख रुपयाची वीज विकली जाणार आहे. एका दिवसात 36 लाखाची वीज निर्मिती होणार असुन वर्षभरात 100 कोटी विज विक्रीतुन या प्रकल्पाला मिळणार आहेत.

हेच गणित साधुन 900 कोटीचा हा प्रकल्प कणकवलीत घालण्याचा घाट आखला जात असुन यदाकदाचित प्रकल्प रद्द झाल्यास 100 कोटी रुपये या कंपनीला संबंधित संस्थेने देणे आवश्यक आहे. याचाच अर्थ आमदार नितेश राणे 100 कोटीचा बोजा नगरपंचायतीच्या माथी ठेवणार असल्याचा आरोप सुशांत नाईक यानी केला असुन हा न होणारा प्रकल्प आहे.

वेंगुर्ले नगरपरीषदेने स्वतःचा 5 टनाचा प्रकल्प विकसीत केला आहे. भारतात अन्य ठिकाणी कमी खर्चाचे प्रकल्प असताना कणकवलीतच 900 कोटीचा जाचक अटींचा हा प्रकल्प कशासाठी ? असा सवाल करताना 3 हेक्टरमध्ये 900 कोटीचा प्रकल्प उभा राहणार कसा ? याचे उत्तर सबंधितानी द्यावे. असे सांगतानाच आमचे या सत्ताधार्‍यांना आव्हान आहे.

या प्रकल्पासाठी 900 कोटी आणुन दाखवाच आणि जाचक अटी लादुन हा प्रकल्प लादला जात असेल तर शिवसेनेच्या माध्यमातुन या प्रकल्पाला आम्ही ठामपणे विरोध करु असेही सुशांत नाईक यानी यावेळी सांगितले.

Web Title: Waste conditions will not be allowed in Kankavali: Sushant Naik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.