तेरेखोल नदीला पूर; बांदा बाजारपेठेतील आळवाडा भागात शिरले पाणी
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: September 11, 2022 10:36 AM2022-09-11T10:36:51+5:302022-09-11T10:37:43+5:30
संततधार पावसामुळे तेरेखोल नदीला पूर, जिल्ह्यात रात्रभर पावसाची संततधार
महेश सरनाईक
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात शनिवारी सायंकाळपासून कोसळत असलेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तेरेखोल नदीला आलेल्या पुराचे पाणी बांदा शहरातील आळवाडी भागात शिरले आहे.
पावसाचा जोर कायम असल्याने शहरात पुरस्थिती उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट झाले असून सरपंच अक्रम खान, तलाठी वर्षा नाडकर्णी यांनी तात्काळ पुरस्थितीची पाहणी करत व्यापाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. शहरातील आळवाडी -शिवाजी चौक रस्ता पाण्याखाली गेला आहे. येथील अनेक दुकानात पुराचे पाणी शिरले आहे. पाण्याचा वेग वाढत असल्याचे स्थानिक व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.
दरम्यान शनिवारी रात्रभर कोसळणाऱ्या पावसाने रविवारी सकाळपासून काहीशी उघडिप दिली आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. जिल्ह्यात मागील चौवीस १०० मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाल्याने नदी, नाले, ओहोळ तुडूंब भरून वाहत आहेत.