सावंतवाडी-वेंगुर्ला मार्गावर होडावडे पुलावर पाणी, वाहतूक ८ तास ठप्प; पाऊस ओसरल्यानंतर सुरळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 01:48 PM2023-07-15T13:48:43+5:302023-07-15T13:48:56+5:30

मार्गाची अवस्था बिकट

Water on Hodawade bridge on Sawantwadi Vengurla road, traffic blocked for 8 hours; Smooth after the rain | सावंतवाडी-वेंगुर्ला मार्गावर होडावडे पुलावर पाणी, वाहतूक ८ तास ठप्प; पाऊस ओसरल्यानंतर सुरळीत

सावंतवाडी-वेंगुर्ला मार्गावर होडावडे पुलावर पाणी, वाहतूक ८ तास ठप्प; पाऊस ओसरल्यानंतर सुरळीत

googlenewsNext

तळवडे : गुरुवारी रात्रीपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे सावंतवाडी तळवडे वेंगुर्ला वाहतूक ठप्प झाली आहे. नदी होडवडे नदीपात्राचे पाणी वाढल्याने व पुलावरून वाहत असल्याने शुक्रवार सकाळपासून वाहतूक बंद झाली. पुलाची उंची कमी असल्याने पुलावर लगेच पाणी येते. त्यामुळे शालेय विद्यार्थी व नोकरदारांचे मोठे नुकसान होत. पाणी कमी झाल्याशिवाय कोणीही पुलावरून वाहतूक करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, शुक्रवारी दुपारनंतर पाणी ओसरल्याने वाहतूक सुरळीत झाली.

सावंतवाडी वेंगुर्ला मार्गावर तळवडे होडावडे नदीपात्राला मुसळधार मुसळधार पावसाने पुलावर पाणी आले. होडावडे पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक सकाळी अकरा वाजेपर्यंत बंदच होती. मध्यरात्रीपासून हा महामार्ग बंद झाला असल्याने त्यामुळे वाहन चालक व नोकरदार वर्गाचे मोठे शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान होते. तसेच शालेय विद्यार्थ्यांचे सुद्धा मोठे नुकसान होते.

या पुलाची उंची वाढवावी यासाठी वारंवार मागणी केली जात आहे. मात्र, या पुलाची उंची वाढवली जात नाही. हे पूल पुरातन असून, या पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी वाहन चालक, ग्रामस्थ व नोकरदार वर्गातून होत आहे. संबंधित प्रशासनाने व लोकप्रतिनिधी, आमदार, खासदारांनी याकडे लक्ष घालून या पुलाची उंची वाढवण्यासाठी व नवीन पूल बांधण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांत व्यक्त होत आहे.

मार्गाची अवस्था बिकट

या पुलावर पाणी आले तरी काही वाहन चालक दुचाकी चालक या पुलावरून आपली वाहने पुढे चालवतात. त्यामुळे या ठिकाणी पोलिस कर्मचारी तत्काळ तैनात केले जात असतात. मात्र, तरीही काही वाहन चालक या पुलाच्या पाण्यातून आपल्या गाड्या घालत असतात. काही लोक जीव मुठीत घेऊन मार्ग काढतात, अशी बिकट अवस्था या मार्गाची बनली आहे.
 

Web Title: Water on Hodawade bridge on Sawantwadi Vengurla road, traffic blocked for 8 hours; Smooth after the rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.