वीस वर्षांत प्रथमच सावंतवाडीत पाणीटंचाई, कारण शोधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:45 PM2021-03-25T16:45:18+5:302021-03-25T16:51:26+5:30
Sawatnwadi watershorteg Sindhudurg- गेल्या वीस वर्षांत सावंतवाडी शहरवासीयांना पाणीटंचाई भासली नव्हती. पण मागील तीन महिन्यांत पाणीटंचाई जाणवू लागली आहे. पाण्याच्या वेळा बदलूनही पाणीपुरवठा होत नसल्याने मुख्याधिकारी यांनी याबाबत योजना आखावी, अशी मागणी शहरातील सहा माजी नगरसेवकांनी केली आहे. त्यांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांची भेट घेतली. यावेळी जावडेकर यांनी सध्याच्या परिस्थितीत दिवसा दोन वेळा पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले.
सावंतवाडी : गेल्या वीस वर्षांत सावंतवाडी शहरवासीयांना पाणीटंचाई भासली नव्हती. पण मागील तीन महिन्यांत पाणीटंचाई जाणवू लागली आहे. पाण्याच्या वेळा बदलूनही पाणीपुरवठा होत नसल्याने मुख्याधिकारी यांनी याबाबत योजना आखावी, अशी मागणी शहरातील सहा माजी नगरसेवकांनी केली आहे. त्यांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांची भेट घेतली. यावेळी जावडेकर यांनी सध्याच्या परिस्थितीत दिवसा दोन वेळा पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले.
यावेळी माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, उमाकांत वारंग, संजय पेडणेकर, कीर्ती बोंद्रे, अफरोज राजगुरू उपस्थित होते, तर निवेदनावर माजी नगरसेविका साक्षी कुडतरकर व शुभ्रा सावंत यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
सावंतवाडी शहरामध्ये जानेवारीपासूनच पाणीटंचाई भेडसावत आहे.
पाणीपुरवठा योजनेमध्ये मुबलक पाणी असून, पाण्याच्या वेळा बदलूनही पाणीटंचाई जाणवत असल्याने मुख्याधिकारी यांनी याबाबत उपाययोजना करावी, अशी मागणी केली. तर भोगटे यांनी चितारआळी, भटवाडी, वैश्य वाडा, उभाबाजार, सालईवाडा या भागात पाणी पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली.
विलास जाधव यांनी मोर डोंगरी, गणेश नगर, सर्वोदय नगर, गरड तर उमाकांत वारंग यांनी खासकीलवाडा भागात पाणीपुरवठा योजना फुटली असल्याकडे लक्ष वेधले. अफरोज राजगुरू यांनी बुराण गल्ली, जुम्मा मशिदपर्यंत, तर कीर्ती बोंद्रे, विलास जाधव यांनी पाणीटंचाईबाबत लक्ष वेधले. सावंतवाडी शहरामध्ये एक वेळ पाणीपुरवठा असला तरी तो पुरेसा असावा याकडे या नगरसेवकांनी लक्ष वेधले. यापूर्वी अशी पाणीटंचाई जाणवली नसल्याचे त्यांनी सांगितले.
यापूर्वीदेखील एकवेळ पाणीपुरवठा होत होता
यावेळी मुख्याधिकारी जयंत जावडेकर म्हणाले, शहरात पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून वेळापत्रक बदलले गेले. मात्र, आजच्या परिस्थितीत शहरात दोन वेळा पाणीपुरवठा करणे शक्य नाही. यावेळी पाणीपुरवठा अभियंता भाऊ भिसे यांनीदेखील शहरामध्ये जेथे पाण्याचा प्रश्न निर्माण होतो आहे, तेथे आम्ही जाऊन पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी प्रयत्न करीत आहोत. पूर्वीदेखील एक वेळ पाणीपुरवठा होत होता याकडे लक्ष वेधले.