देवगड-जामसंडे नगरपंचायत हद्दीत पाणीटंचाईचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 11:32 AM2019-06-03T11:32:51+5:302019-06-03T11:33:39+5:30
गतवर्षी अनियमित पावसामुळे चालूवर्षी ऐन उन्हाळी हंगामात पाण्याची पातळी कमी होऊन पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. यातच देवगड-जामसंडे नगरपंचायत हद्दीत एकूण ३ हजार नळग्राहक असून यापूर्वी त्यांना १९ लाख लीटर पाणीपुरवठा होत असे परंतु सद्यस्थितीत या पाणीपुरवठ्यात कपात करण्यात आली असून ३ दिवसानंतर १२ लाख लीटर पाणीपुरवठा नागरिकांना केला जात आहे. या पाणीकपातीतीत नागरिकांनी पाण्याचा योग्य वापर करून नगरपंचायत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर यांनी केले.
देवगड : गतवर्षी अनियमित पावसामुळे चालूवर्षी ऐन उन्हाळी हंगामात पाण्याची पातळी कमी होऊन पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. यातच देवगड-जामसंडे नगरपंचायत हद्दीत एकूण ३ हजार नळग्राहक असून यापूर्वी त्यांना १९ लाख लीटर पाणीपुरवठा होत असे परंतु सद्यस्थितीत या पाणीपुरवठ्यात कपात करण्यात आली असून ३ दिवसानंतर १२ लाख लीटर पाणीपुरवठा नागरिकांना केला जात आहे. या पाणीकपातीतीत नागरिकांनी पाण्याचा योग्य वापर करून नगरपंचायत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर यांनी केले.
देवगड-जामसंडे नगरपंचायत कार्यालयात ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष संजय तारकर, बांधकाम सभापती निरज घाडी, महिला बालकल्याण सभापती उज्ज्वला अदम, माजी नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, नगरसेवक, नगरसेविका आदी उपस्थित होते.
नगराध्यक्ष चांदोस्कर म्हणाले की, देवगड-जामसंडे नगरपंचायत हद्दीतील नळग्राहकांना यापूर्वी ४ लाख लीटर पाणी पाडागर येथून व ८ लाख लीटर पाणी दहीबाव येथून घेतले जात होते. परंतु दहीबाव अन्नपूर्णा नदीतील गाळ काढल्यानंतर नदीच्या पात्रातील पाणी जॅकव्हेलच्या खाली गेल्याने ते प्रमाण ८ लाखांवरून ४ लाख एवढे करण्यात आले व उर्वरित ८ लाख लीटर पाणी पाडागर येथून घेतले जात आहे.
अशा प्रकारे एकूण १२ लाख लीटर पाणीसाठा नागरिकांना ३ दिवस आड करून पुरविण्यात येत आहे. या व्यतिरिक्त अन्य कोणतेही पाणीस्त्रोत नसल्याने प्रसंगी गाळ उपसल्यानंतर पुरवठा करण्यात आलेले गढूळ पाणी नागरिकांनी उकळून, गाळून पिणे आवश्यक असल्याचे मत नगराध्यक्ष चांदोस्कर यांनी व्यक्त केले.