जलक्रीडा व किल्ले प्रवासी होडी वाहतूक २६ मे पासून बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 11:39 AM2024-05-13T11:39:32+5:302024-05-13T11:40:08+5:30

मालवण : जलक्रीडा व किल्ले सिंधुदुर्ग प्रवासी होडी वाहतूक पावसाळी हंगामात म्हणजे २६ मे ते ३१ ऑगस्ट या कालावधीत ...

Water sports and forts passenger boat traffic closed from May 26 | जलक्रीडा व किल्ले प्रवासी होडी वाहतूक २६ मे पासून बंद

जलक्रीडा व किल्ले प्रवासी होडी वाहतूक २६ मे पासून बंद

मालवण : जलक्रीडा व किल्ले सिंधुदुर्ग प्रवासी होडी वाहतूक पावसाळी हंगामात म्हणजे २६ मे ते ३१ ऑगस्ट या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश प्रादेशिक बंदर अधिकारी एस. व्ही. भुजबळ यांनी दिले आहेत. याबाबत महाराष्ट्र सागरी मंडळाच्या मुख्य बंदर अधिकाऱ्यांनी पाठविलेल्या पत्रानुसार कार्यवाही करण्याचेही निर्देश प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांनी सर्व बंदर निरीक्षक व सहायक बंदर निरीक्षकांना दिले आहेत.

दरम्यान, सध्या सागरी हवामान चांगले आहे. त्यामुळे जलक्रीडा व किल्ले सिंधुदुर्ग प्रवासी होडी वाहतुकीला मुदतवाढ द्यावी अशी मागणी पर्यटन व्यावसायिकांनी केली आहे. सरसकट आदेश, नियमामुळे सागरी पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या स्थानिक व्यावसायिकांना दरवर्षी लाखो रुपयांच्या आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागते. 

दरवर्षी १० जूनपर्यंत सागरी पर्यटनासाठी देश-विदेशातील लाखो पर्यटक जिल्ह्याच्या सागरी किनारपट्टीवर भेट देतात. किनारपट्टीवरील वातावरणाचा विचार करता २६ ते ३१ मे अशी पहिल्या टप्प्याची, तर सागरी हवामान चांगले असल्यास १ ते १० जूनपर्यंत दुसऱ्या टप्प्याची मुदतवाढ मिळावी. १० जूननंतर सरासरी पाऊस सक्रिय होतो. या पूर्वीही सागरी पर्यटनाला मुदतवाढ मिळाली आहे. जलक्रीडा व किल्ला प्रवासी होडी वाहतुकीसाठी परवानगी मिळावी, अशी मागणी स्थानिक व्यावसायिक करत आहेत.

Web Title: Water sports and forts passenger boat traffic closed from May 26

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.