लाटांमुळे सागरेश्वर येथील वुड हाऊसचे नुकसान,एका बाजूने खचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 01:50 PM2020-07-21T13:50:40+5:302020-07-21T14:35:12+5:30

पर्यटनवृद्धीच्या उद्देशाने वेंगुर्ला सागरेश्वर किनारी उभारण्यात आलेल्या वुड हाऊसचे समुद्राच्या लाटांनी प्रचंड नुकसान झाले आहे. या प्रकल्पातील वुड हाऊस एका बाजूने खचले असून समुद्रात वाहून जाण्याच्या स्थितीत आहे. तर चुकीच्या पद्धतीने बांधकाम झाल्याने शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.

The waves damaged the Wood House at Sagareshwar, to one side | लाटांमुळे सागरेश्वर येथील वुड हाऊसचे नुकसान,एका बाजूने खचले

लाटांमुळे सागरेश्वर येथील वुड हाऊसचे नुकसान,एका बाजूने खचले

Next
ठळक मुद्देलाटांमुळे सागरेश्वर येथील वुड हाऊसचे नुकसान,एका बाजूने खचलेसमुद्रात वाहून जाण्याच्या स्थितीत, चुकीच्या पद्धतीने बांधकाम, लाखो रुपये पाण्यात

वेंगुर्ला : पर्यटनवृद्धीच्या उद्देशाने वेंगुर्ला सागरेश्वर किनारी उभारण्यात आलेल्या वुड हाऊसचे समुद्राच्या लाटांनी प्रचंड नुकसान झाले आहे. या प्रकल्पातील वुड हाऊस एका बाजूने खचले असून समुद्रात वाहून जाण्याच्या स्थितीत आहे. तर चुकीच्या पद्धतीने बांधकाम झाल्याने शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.

वेंगुर्ला तालुक्यातील पर्यटनाचा केंद्रबिंदू समजल्या जाणाऱ्या सागरेश्वर किनारी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने गेली दीड ते दोन वर्षे या वुड हाऊस प्रकल्पाचे काम सुरू होते. या प्रकल्पाचे जवळजवळ ८० टक्के काम हे पूर्ण झाले होते.

काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे समुद्राच्या लाटांचा जोर वाढून या प्रकल्पासाठी समुद्रकिनाऱ्यांवर उभारण्यात आलेला पाया हा ढासळण्यास सुरुवात झाली होती. दरम्यान, मागील दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे समुद्रालाही मोठे उधाण आले होते. शनिवारी रात्रीपासून समुद्राच्या लाटांचा जोर हा पुन्हा वाढला होता. यामुळे रविवारी पहाटे या प्रकल्पाच्या शेवटी असणारे वुड हाऊस हे एका बाजूने खचले असून ते समुद्रात वाहून जाण्याच्या स्थितीत आहे.

दरम्यान, या प्रकारची माहिती मिळताच उभादांडा गावचे ग्रामविकास अधिकारी अरुण जाधव, तलाठी गोरड, ग्रामपंचायत सदस्य मधुकर तिरोडकर, आशु फर्नांडिस, पोलीस पाटील विजय नार्वेकर, भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस हितेश धुरी, भूषण आंगचेकर, ग्रामस्थ डुमिंग डिसोजा यांनी तत्काळ याठिकाणी पाहणी केली. याबाबत पाहणीचा अहवाल आम्ही वरिष्ठ पातळीवर व पर्यटन विकास महामंडळ यांच्याकडे पाठविणार आहोत असे ग्रामविकास अधिकारी जाधव यांनी सांगितले. याबाबत धुरी यांनी महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे टिष्ट्वटरद्वारे चौकशीची मागणी केली आहे.

सखोल चौकशी करावी

एमटीडीसीमार्फत पर्यटनाच्या नावाखाली पैसे कसे पाण्यात घालविले जातात याचे हे उत्तम उदाहरण आहे. या अगोदर जे जे पकल्प एमटीडीसीने या सागरेश्वर किनारी राबविले आहेत ते किती यशस्वी झाले याचाही खुलासा त्यांनी करावा. शासनाने सखोल चौकशी करावी, अशी मागणी भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस हितेश धुरी यांनी केली आहे.

Web Title: The waves damaged the Wood House at Sagareshwar, to one side

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.