गाव विकासासाठी आमचे सहकार्य मिळेल : राजन तेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 05:44 PM2017-10-30T17:44:11+5:302017-10-30T17:54:19+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गावाच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या १४ व्या वित्त आयोगातून थेट निधी ग्रामपंचायतीला दिल्यामुळे ग्रामपंचायती सधन झाल्याने गावचा विकास करण्यासाठी निधी अपुरा पडणार नाही.

We will get our support for the development of the village: Rajan Teli | गाव विकासासाठी आमचे सहकार्य मिळेल : राजन तेली

वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण जिल्हा परिषद मतदार संघातील मेढा-निवती ग्रामपंचायतीमधील ग्रामविकास पॅनेलच्या सरपंच भारती धुरी, ग्रामपंचायत सदस्य नागेश सारंग, अजित खवणेकर, विरश्री मेथर, नमिता घाटवळ यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

googlenewsNext
ठळक मुद्देमेढा-निवती ग्रामपंचायतीमधील ग्रामविकास पॅनेलचे सरपंच धुरी, सारंग, खवणेकर, मेथर, घाटवळ भाजपात

वेंगुर्ले ,दि. ३० :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गावाच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या १४ व्या वित्त आयोगातून थेट निधी ग्रामपंचायतीला दिल्यामुळे ग्रामपंचायती सधन झाल्याने गावचा विकास करण्यासाठी निधी अपुरा पडणार नाही.

मेढा-निवती गावाच्या विकासासाठी भाजपाकडून सहकार्य मिळेल, असे आश्वासन भाजपा प्रदेश चिटणीस तथा माजी आमदार राजन तेली यांनी मेढा-निवती येथील कार्यक्रमात दिले.


वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण जिल्हा परिषद मतदार संघातील मेढा-निवती ग्रामपंचायतीमधील ग्रामविकास पॅनेलच्या सरपंच भारती धुरी, ग्रामपंचायत सदस्य नागेश सारंग, अजित खवणेकर, विरश्री मेथर, नमिता घाटवळ यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राजू राऊळ, तालुकाध्यक्ष प्रसन्ना देसाई, जिल्हा चिटणीस साईप्रसाद नाईक, नगरसेवक सुहास गवंडळकर, तालुका सरचिटणीस प्रशांत खानोलकर, मच्छिमार नेते अशोक सारंग, मच्छिमार सोसायटी चेअरमन कमलेश मेथर, रमाकांत मेथर उपस्थित होते.


भाजपा पक्ष हा मच्छिमारांच्या मागे ठामपणे उभा राहिल्यामुळे सर्व ग्रामस्थांनी ही ग्रामपंचायत भाजपाकडे देण्याचे ठरविले. तसेच केंद्र्रात व राज्यात भाजपाची सत्ता असल्याने मासेमारी करताना येणाºया अडचणी, गाळाने भरलेली बंदरे, जेटी, मच्छिमारांना आवश्यक असलेल्या सोयीसुविधा मिळण्यासाठी पक्षाच्यावतीने प्रयत्न व्हावेत, अशी मागणी करण्यात आली.

तालुकाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षामध्ये स्वागत करुन मच्छिमारांचे प्रश्न सोडविण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत लवकरच बैठकीचे आयोजन केले जाणार असल्याचे सांगितले.

यावेळी किरण खवणेकर, कृपावंत खवणेकर, राजू भगत, राजेंद्र्र धुरी, नाना सावंत, प्रशांत भगत, प्रशांत केळुसकर, रामचंद्र्र भगत, परशुराम भगत आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

मेढा-निवती ग्रामपंचायतीमधील ग्रामविकास पॅनेलचे सरपंच व चार सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी राजन तेली, राजू राऊळ, तालुकाध्यक्ष प्रसन्ना देसाई, साईप्रसाद नाईक आदी उपस्थित होते.

Web Title: We will get our support for the development of the village: Rajan Teli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.