दहशत, अपप्रवृत्ती विरोधात आवाज उठवणार - संदेश पारकर 

By सुधीर राणे | Published: September 8, 2023 07:22 PM2023-09-08T19:22:07+5:302023-09-08T19:23:00+5:30

कणकवली : माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे , युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी माझ्यावर ...

We will raise our voices against terror and misogyny says Sandesh Parkar | दहशत, अपप्रवृत्ती विरोधात आवाज उठवणार - संदेश पारकर 

दहशत, अपप्रवृत्ती विरोधात आवाज उठवणार - संदेश पारकर 

googlenewsNext

कणकवली : माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे. या जबाबदारीच्या माध्यमातून सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन कणकवली, देवगड, वैभववाडी आणि मालवण या चारही तालुक्यांमध्ये संघटनात्मक बांधणी करण्यात येईल. आम्ही दहशत,अपप्रवृत्ती विरोधात आवाज उठवणार आहोत.कणकवली विधानसभेसाठी उमेदवार कोण ? यापेक्षा शिवसेना संघटना बांधणी हे महत्वाचे असल्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नूतन जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी सांगितले.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा गावभेट कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक गावातील शिवसैनिकांना ताकद देणार आहे. ज्या मालवण मध्ये राणेंचा पराभव वैभव नाईक यांनी केला. त्याचप्रमाणे कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकेल, अशी संघटना बांधणी केली जाईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कणकवली येथील विजय भवन  येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला आघाडी अध्यक्षा निलम पालव -सावंत, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, देवगड तालुकाप्रमुख मिलिंद साटम, शहरप्रमुख प्रमोद मसुरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ते म्हणाले, धनशक्तीच्या जोरावर फोडाफोडीचे राजकारण करून स्थानिक सत्ता व कार्यकर्ते फोडण्याचे काम भाजपकडून केले जात आहे. त्या विरोधात जनतेच्या मनात तीव्र संतापाची लाट आहे. त्यामुळे शिवसेना संघटना बांधणी करत राणे भाजपचा पराभव कणकवलीत घडवणार आहोत. एक वर्ष हे निवडणुकीचे आहे. पुढच्या वर्षभरात परिवर्तन घडेल.

खासदार विनायक राऊत जेव्हा पहिल्यांदा खासदारकीसाठी उभे राहिले तेव्हा नवखे होते,मात्र तेव्हाच्या मूठभर शिवसैनिकांच्या जीवावर ते लढले. दोनदा निलेश राणेचा पराभव त्यांनी केला. कुडाळ -मालवण विधानसभा निवडणुकीत राणेंचा पराभव वैभव नाईक यांनी केला. जिल्ह्यातील जनतेला हा दहशत वाद मान्य नाही. त्यामुळे या अप प्रवृत्तीच्या विरोधात शिवसेना लढणार आहे. जिल्ह्यातील आरोग्याचा प्रश्न असेल,प्रशासकीय व्यवस्था व अन्य सर्व समस्यांबाबत शिवसेना यापुढे आक्रमकपणे लढा देईल असेही पारकर यांनी सांगितले.

आता तर हा पक्षासाठी संघर्षाचा काळ आहे. भाजपा विरोधात जनतेच्या मनात फार चीड आहे, संतापाची लाट आहे.त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा राज्याचे नेतृत्व करतील. त्यासाठी संघटनेत, आवश्यक बदल करावे लागतील. जुन्या नव्याने एकत्र करुन चांगली संघटना बांधणी केली जाईल. पक्षाला न्याय देणाऱ्या कार्यकर्त्याला संधी दिली जाईल. असे पारकर म्हणाले.

Web Title: We will raise our voices against terror and misogyny says Sandesh Parkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.