सिंधुदुर्गच्या जिल्हा परिषदेच्या शाळांना निधी देण्याबाबत मार्ग काढू
By admin | Published: March 20, 2017 04:41 PM2017-03-20T16:41:39+5:302017-03-20T16:41:39+5:30
दिपक केसरकर यांचे आश्वासन : प्राथमिक शिक्षण संघाच्या शाखेला भेट
आॅनलाईन लोकमत
कुडाळ, दि. २0 : जिल्हा परिषदेच्या ज्या शाळांना गेली पाच वर्षे चार टक्के सादील रक्कम मिळालेली नाही, अशा शाळांना ती रक्कम मिळण्याबाबत लक्ष घालून मार्ग काढण्याचे आश्वासन सिंधुदुर्गचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी सोमवारी दिले.
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षण संघाच्या सिंधुदुर्ग शाखेला पालकमंत्री दिपक केसरकर यांनी भेट दिली. जिल्हा परिषदेच्या शाळांना त्यांच्यासाठी असलेली गेली पाच वर्षे चार टक्के सादील रक्कम मिळालेली नाही. ही सादील रक्कम सुमारे २८ कोटी ३६ लाख ४५ हजार ९७१ एवढी रक्कम शाळांना देणे बाकी आहे. यामुळे या शाळांची मोठी आर्थिक कुचंबणा झाली आहे.
यावेळी पालकमंत्र्यांसोबत जिल्हाध्यक्ष म. ल. देसाई, उपाध्यक्ष अरुण म्हाडगुत, कुडाळ तालुकाध्यक्ष राजाराम काविटकर, दोडामार्गचे तालुक्याध्यक्ष गुरुदास कुबल, सचिव एकनाथ जानकर, आप्पासाहेब हरमलकर, रविंद्र गुरव, नागेश गावडे यांची उपस्थिती होती.