गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांचे स्वागतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 04:17 PM2020-08-10T16:17:47+5:302020-08-10T16:22:10+5:30

गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांना प्रशासनाने आपुलकीची वागणूक द्यावी. तसेच गणेशमूर्ती दोन फुटांची असावी असा नियम केला आहे, पण, गणेश मूर्तीच्या उंचीवरून कारवाई करू नये, अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या.

Welcome to the servants coming for Ganeshotsav | गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांचे स्वागतच

गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांचे स्वागतच

Next
ठळक मुद्देगणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांचे स्वागतचत्यांना आपुलकीची वागणूक द्या : उदय सामंत यांचे प्रशासनास आदेश

सिंधुदुर्गनगरी : गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांना प्रशासनाने आपुलकीची वागणूक द्यावी. तसेच गणेशमूर्ती दोन फुटांची असावी असा नियम केला आहे. पण, कोकणात मोठ्या मूर्तींची परंपरा आहे. या मूर्ती सहा ते सात महिन्यांपूर्वीपासून निश्चित करण्यात आलेल्या असतात. त्याचा विचार करता गणेश मूर्तीच्या उंचीवरून कारवाई करू नये, अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेली तयारी आणि कोरोना उपाययोजना संदर्भात नियोजन समितीच्या नवीन सभागृहामध्ये आयोजित बैठकीमध्ये पालकमंत्री सामंत यांनी या सूचना केल्या.

यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, सुशांत खांडेकर, वंदना खरमाळे, सर्व तहसीलदार, पोलीस ठाण्यांचे प्रमुख व विभागप्रमुख उपस्थित होते.

जिल्ह्यातील तपासणी नाक्यांवर होत असलेल्या अँटीजेन तपासणीचा वेग वाढविण्याच्या सूचना देऊन पालकमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले की, गणेशोत्सवासाठी येणाऱ्या  चाकरमान्यांची योग्य तपासणी व्हावी. लोकांना आॅक्सिजनची लेवल, कोरोनाची लक्षणे यांची सविस्तर माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने द्यावी. लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.

१२ आॅगस्टनंतर येणाऱ्यांना कोविड टेस्ट बंधनकारक आहे. ४८ तासांच्या आत त्यांनी जिल्ह्यात प्रवेश करावयाचा आहे. पण, त्यानंतर त्यांनी किमान ३ दिवस गृह अलगीकरणात रहावे. उत्सवासाठी येणारे चाकरमानी हे सामान्य नागरिक आहेत.

सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात त्यांचे बरेच हाल झाले आहेत. त्यात प्रवास आणि कोविडचा ताण यामुळे त्यांना बराच त्रास सहन करून प्रवास करावा लागणार आहे. याचा विचार करता येणाºया चाकरमान्यांना कमीत कमी त्रास सहन करावा लागेल याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री सामंत यांनी केल्या.

यावेळी मंत्री सामंत यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. आरोग्य यंत्रणेने केलेल्या उपाययोजनांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला.

कंटेन्मेंट झोनची मर्यादा ५0 मीटरच

सध्या ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत, त्याठिकाणी कंटेन्मेंट झोन केले जात आहेत. हे कंटेन्मेंट झोन जास्तीत जास्त ५0 मीटर क्षेत्राचे करावेत अशा सूचनाही पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिल्या. प्रवाशांकडून जास्तीचे भाडे घेणाऱ्या बस मालकांवर पोलीस आणि आरटीओ या दोन्ही यंत्रणांनी गुन्हा दाखल करावा.

२२ पेक्षा जास्त प्रवासी घेऊन येणाऱ्या बसवर कारवाई करताना प्रथम आलेल्या लोकांना त्यांच्या गावी सोडावे व बसचा परवाना निलंबित करून या बस मालवण येथील पॉलिटेक्निकच्या आवारामध्ये ठेवाव्यात असा सूचना सामंत यांनी केल्या.

Web Title: Welcome to the servants coming for Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.