चिपळूण स्पोर्टस अॅकॅडमीच्या शिवज्योतीचे स्वागत
By admin | Published: February 20, 2015 09:18 PM2015-02-20T21:18:49+5:302015-02-20T23:31:12+5:30
मुंबई-गोवा महामार्गाने धावत हा प्रवास करण्यात आला.. सलग दहाव्या वर्षी या अॅकॅडमीने मोहीम यशस्वीरित्या राबवली आहे.
चिपळूण : वसई येथील आसनगाव माहुली गड ते चिपळूण असा ३४० किलोमीटरचा खडतर प्रवास चिपळूण स्पोर्टस अॅकॅडमीच्या कार्यकर्त्यांनी अवघ्या दीड दिवसात पूर्ण केला. या गडावरुन धावत आणलेल्या शिवज्योतीचे येथील नगर परिषद व संभाजी ब्रिगेडतर्फे स्वागत करण्यात आले. सलग दहाव्या वर्षी या अॅकॅडमीने मोहीम यशस्वीरित्या राबवली आहे. आतापर्यंत चिपळूण स्पोर्टस अॅकॅडमीच्या सदस्यांनी यावर्षी माहुली गडावरुन ही शिवज्योत आणली. शिवजयंतीनिमित्त या गडाकडे इतिहासप्रेमी व शिवप्रेमींचे लक्ष वेधावे, या हेतूने ही मोहीम राबवण्यात आली. चिपळूण स्पोर्टस अॅकॅडमीच्या या मोहिमेला चांगले यश आले आहे. या परिसरातून प्रथमच शिवज्योत आणण्यात आल्याने त्याचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी तमाम चिपळूणकर उपस्थित होते.मुंबई-गोवा महामार्गाने धावत हा प्रवास करण्यात आला. याशिवाय अर्नाळा, कसारा व कशेडी घाट हे तीन महत्त्वाचे टप्पे चिपळूण स्पोर्टस अॅकॅडमीच्या कार्यकर्त्यांनी पार पाडले. यावेळी चिपळूण स्पोर्टस क्लबचे कार्यकर्ते मंदार कानापडे, अभिजीत बुरटे, श्रीपाद पाटील, प्रमोद हरवडे, कैलास बावदाने, दिगंबर शिंदे, योगेश शिंदे, संकेत गजमल, सतीश कदम, नीलेश भुवड, राम कदम, मयूर कदम, अविनाश पवार, सिद्धेश पवार, सौरभ फागे, सुरेश राठोड, मिथून कानापडे, वरद जंगम, विकी बुरटे, अनिल कोरवी, कोमल शिंदे, योगिता शिंदे, पूजा गोरिवले, नमिता बुरटे, प्रियांका मोरे, शुभम घाग, कल्पेश कुळे, सागर हरेकर, अनिकेत हरेकर, नीलेश कदम, संतोष शिंदे, जीवन कांबळे, पंकज आग्रे, दिनेश घडशी आदी सहभागी होते. नगर परिषदेतर्फे या शिवज्योतीचे स्वागत झाले. यावेळी नगराध्यक्षा सावित्री होमकळस, लियाकत शाह, नगरसेवक सुचय रेडीज, चिपळूण स्पोर्टस अॅकॅडमीचे अध्यक्ष बाबू तांबे, नगरसेवक राजू देवळेकर, राजू कदम, शशिकांत मोदी, सायली काते, इनायत मुकादम, सीमा चाळके व नगर परिषद कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)